वाढदिवसानिमित्त सोलापूर मनसेची राज ठाकरेंना अनोखी भेट
पदाधिकार्यांनी मिळवून दिला कोरानाच्या रूग्णाला डिस्चार्ज–दिलीप धोत्रे
प्रतिनिधी रफीक आत्तार
सोलापूर येथे केवळ बिल भरले नाही म्हणून कोरोनाग्रस्त रुग्णाला गेल्या चार दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये ठेवणार्या कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण रुग्णालयाला मनसेच्या पदाधिकार्यांनी चांगलाच धडा शिकवला. मनसे पदाधिकार्यांच्या दणक्यानंतर अखेर हॉस्पिटल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करत संबंधित रुग्णाल त्याच्या घरी रवाना केले. गरीब रूग्णाला मदत करीत मनसेने पक्षप्रमुख राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त एक अनोखी भेटच दिली आहे कुंभारी सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये बार्डी (तालुका पंढरपूर) येथील एक गरीब व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला म्हणून ऍडमिट करण्यात आले होते. त्याच्यावर सर्व औषधोपचार झाल्यावर त्याची टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
मात्र डिस्चार्ज देताना हॉस्पिटल प्रशासनाने त्याचे बिल 32 हजार 800 रूपये केले. वास्तविक पाहता कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असतानाही कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटलने त्याच्याकडे पैशासाठी वारंवार तगादा लावला. पैसे न दिल्याने संबंधित रुग्णाला चार दिवस हॉस्पिटल प्रशासनाने सोडले नाही. शेवटी या रुग्णाने मनसेचे जिल्हा सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्याशी संपर्क साधला. धोत्रे आणि ताबडतोब हालचाली करत पालकमंत्र्यांनी पासून ते सिव्हिलच्या वैद्यकीय अधीक्षक पर्यंत सर्वांना फोनाफोनी केली. मात्र जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरआणि पंढरपूर येथील प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी खूप मदत केली . जिल्हाधिकारी यांनी स्वतः या घटनेची दखल घेऊन अश्विनी हॉस्पिटल प्रशासनास रुग्णाला त्वरित सोडण्याचे आदेश दिले,,अखेर मनसेने अश्विनी हॉस्पिटल प्रशासनाला त्यांचा हिसका दाखविला. मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनिद्दीन शेख, उपजिल्हा अध्यक्ष अमर कुलकर्णी, राहुल अक्कलवडे यांनी रविवारी सकाळी कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटलकडे आपला मोर्चा वळवला आणि त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाला याचा चांगला जाब विचारत खडसावले. जिल्हाधिकारी यांना थेट फोन करत त्यांना याबाबीची कल्पना दिली. मनसेच्या या दणक्यानंतर अखेर हॉस्पिटल प्रशासनाने कोणतेही बिल न घेता त्या रुग्णाला आपल्या गावी रूग्णवाहिकेेले रवाना केले. दरम्यान, रविवार, 14 जून रोजी पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस. याच दिवशी मनसेच्या पदाधिकार्यांनी गरिब रूग्णाला न्याय देत राज ठाकरे यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली.
धोत्रे यांनी मानले जिल्हाधिकारी, प्रांताधिकार्यांचे आभार
बार्डी येथील रूग्णाला सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पंढरपूरचे प्रांताधिकारी ढोले,तहसीलदार वैशाली वाघमारे यांचे मोठे सहकार्य लाभले. या दोघांना मनसेच्या पदाधिकार्यांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी फोननवरून चौकशी केली. त्या गरिब रूग्णाला सोडवण्यास सहकार्य केल्याबद्दल मनसेचे जिल्हा सरचिणीस दिलीप धोत्रे यांनी त्यांचे आभार मानले.






