Usmanabad

?️ उस्मानाबाद:-धक्कादायक, उपचारासाठी दाखल संशयित रुग्णाचा मृत्यु

उस्मानाबाद:-धक्कादायक, उपचारासाठी दाखल संशयित रुग्णाचा मृत्यु

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेला एक कोरोना संशयित रुग्ण आज दिनांक 28 मे गुरुवारी रोजी सकाळी बाथरूममध्ये पडून मयत झालेला आहे.अशी माहिती समोर येत आहे..

त्या रुग्णाचा स्वेब तपासणीसाठी लातूर येथे पाठवण्यात आलेला आहे. जर हा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला तर पार्थिव देहाचे शवविच्छेदन करता येत नाही, .

हा रुग्ण आधीच्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेला होता .अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. गुरुवारी सकाळी हा रुग्ण बाथरूममध्ये गेला असता तो आतध्ये पडून मयत झाला. त्याने बाथरूमची कडी आतून लावली होती.

बराच वेळ झाला तरी हा रुग्ण बाहेर आला नाही म्हणून तेथील काही कर्मचाऱ्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडून त्यास आतमध्ये पहिले असता तो मयत झालेला होता. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button