Indapur

?️ इंदापूर तालुक्यात कोरोनाचा पहीला बळी

?️ इंदापूर तालुक्यात कोरोनाचा पहीला बळी.

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: पुणे जिल्ह्यातील इंदापूर मध्ये कोरोनाने पहीला बळी घेतला असून भिगवण येथील त्या कोरोनाग्रस्त महीलेचा कोरोना महाराक्षसाने गळा घोटला आहे. आज सकाळी उपचाराने दरम्यान मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मंगळवार(दि.२८) रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात भिगवण स्टेशन परिसरात कोरोनाचा पहीला रुग्ण आढळला होता. तालुक्यात अद्यापपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. या महीलेच्या रुपाने कोरोना इंदापूर तालुक्यात दाखल झाला होता एका ६५ वर्षे वयाच्या महीलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार चालू होते. मात्र आज सकाळी साधारण दहा वाजता उपचाराच्या दरम्यान या महीलेचा मृत्यू झाल्याने एक प्रकारे त्या महीलेची झुंज अपयशी ठरली आहे.

मात्र असे असले तरी या महीलेवर भिगवण परिसरात ज्या डाॅक्टरांनी उपचार केले होते तो डाॅक्टर व एका लॅबोरेटरी मधील पॅथोलाॅजिस्ट चा ही कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे एक प्रकारचा दिलासा यातून मिळालेला आहे. मात्र अद्यापही उर्वरित सहा नागरिकांचा कोरोना चाचणी अहवाल येणे बाकी असल्याने थोडी चिंता आहे.

तर दुसरी दिलासादायक बाब म्हणजे त्या कोरोनाग्रस्त महीलेच्या कुटुंबातील तिचा मुलगा,सुन व दोन नातवंडे यांचीही कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. य महीलेच्या संपर्कात आलेल्या एकूण अठ्ठावीस नागरिकांपैकी चोवीस जनाचे स्वॅब आरोग्य विभागाने घेतले होते. व यापैकी अठरा व्यक्तींची कोरोना चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. तर स्वॅब घेतलेल्या सहा नागरिकांचे अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button