सामाजिक बांधिलकी जपत उद्योजक शिवराज बिराजदार यांच्या परिवाराकडून पोलिसांना काजू, मनुके व पाणीचे बॉटल वाटप
प्रतिनिधी कृष्णा यादव, अक्कलकोट, दि.27:-
जगभरात कोरोनाचा हाहाकार चालू असताना सामाजिक बांधिलकी जपत उद्योजक शिवराज बिराजदार यांच्या परिवाराकडून पोलिसांना काजू, मनुके व पाणीचे बॉटल वाटप करण्यात आले.
कोरोनाचा हा संसर्गजन्य रोग असून माणसांमधील अंतर एक मीटर असणे गरजेचे आहे पण लोकांनी याची काळजी घ्यावी व लोकांनी विनाकारण रस्त्यावर फिरवू नाका. अत्यावश्यक असल्यास बाहेर पडत असताना तोंडाला मास्क घालूनच बाहेर पडावे असे आवाहन उत्तर पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक कल्लप्पा पुजारी यांनी केले.
येथील बस स्टँड, एम.एस.ई.बी, कारंजा चौक व मंगरूळ प्रशाला चौकात बंदोबस्तासाठी उभे असलेल्या पोलिसांना काजू, मनुके व पाणीचे बॉटल वाटप करण्यात आले. यावेळी उद्योजक विश्राम पटेल व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.






