Chimur

छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या परिवाराबाबत आक्षेपार्ह टीका करणार्या इसमाला शिवप्रेमींनी दिला चोप आरोपी सिंदेवाही पोलिसांच्या ताब्यात

छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या परिवाराबाबत आक्षेपार्ह टीका करणार्या इसमाला शिवप्रेमींनी दिला चोपआरोपी सिंदेवाही पोलिसांच्या ताब्यात

चिमूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके
सिंदेवाही –
छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव आज देशातला प्रत्येक सुजाण नागरिक आदराने घेतो, कारण महाराजांचा इतिहास हा शौर्य, शासन, स्वराज्य या नावाने नोंदल्या गेला आहे.
परंतु आजही महाराजांवर काही विकृत बुद्धीचे लोक हे टीका करीत असतात, महाराजांवर टीका म्हणजे विभिन्न समाजात तेढ निर्माण करण्याच काम, डॉ बाबासाहेब आंबेडकर देशाचे संविधान निर्माते आज बाबासाहेब यांचे विचार प्रत्येक नागरिक अंगीकारत आहे, संविधानात उल्लेख केला आहे कोणत्याही समाजाविषयी वाईट बोलू नका आपण सर्व एकच आहो अशी शिकवण बाबासाहेबांनी आपल्याला दिली आहे.

परंतु पेंढरी मधील जितेंद्र राऊत या इसमाने अतिशय खालच्या पातळीवर जात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, येसूबाई यांच्याबद्दल अतिशय अश्लील शब्दात फेसबुक वर पोस्ट करीत टीका केली, राऊत यांच्या कृत्याने महाराष्ट्रातील शिवभक्त प्रचंड आक्रोशीत झाला आहे, याबाबत अनेक सामाजिक संघटनांनी राऊत यांचेवर कारवाई व्हावी यासाठी निवेदने सुद्धा दिली परंतु राऊत यांनी टीका टिप्पणी थांबवली नाही.चंद्रपूर जिल्हा शिवप्रेमींच्या नजरेत जेव्हा हा पूर्ण प्रकार माहीत पडला त्यांनी तात्काळ सिंदेवाही गाठत राऊत यांची चौकशी केली, शिवप्रेमी यांचा आक्रोश बघता राऊत हे शेतात दडून बसले होते, त्याला पकडत चांगलाच चोप देत, गळ्यात चप्पलेचा हार घालत शहरातून धिंड काढली व छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज व येसूबाई यांची माफी मागायला लावली.शिव प्रेमींनी जितेंद्र राऊत याला सिंदेवाही पोलीस स्टेशनला नेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, यावेळी.. संदीप गिर्हे, प्रमोद पाटील, स्वप्नील काशीकर, आशिष कावटवार, आशिष चितलवार,
टायगर ग्रुप नवरगावचे- गणेश ठाकरे, अजित सुकारे , विक्रांत सहारे, राहुल विरुटकर सुरज घोगे,प्रणय धोबे, हर्षद कानपेलीवार,मनिष जेठानी,पपू सरवान,पंकज नांनेवार,सोनू ठाकुर,किरण निबरड,गिरिश कटारे,व आदी टायगर ग्रुप तथा संपूर्ण शिवप्रेमी उपस्थित होते.विशेष म्हणजे जितेंद्र राऊत यांनी काही वर्षांपूर्वी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढली आहे, त्यांच्या पत्नीने सुद्धा चिमूर विधानसभा निवडणूक लढवली आहे, सुशिक्षित असलेल्या या जितेंद्र राऊत यांनी केलेली टीका म्हणजे अशिक्षितपणाचे लक्षणच म्हणावे लागेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button