Indapur

इंदापूर राष्ट्रवादी तालुकाध्यक्षाची पदावरून उचलबांगडी ! तालुक्याचे नवे अध्यक्ष हनुमंत कोकाटे.

इंदापूर राष्ट्रवादी तालुकाध्यक्षाची पदावरून
उचलबांगडी ! तालुक्याचे नवे अध्यक्ष हनुमंत कोकाटे.

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष महारूद्र पाटील यांची आज दिनांक १४मार्च रोजी इंदापूर तालुकाध्यक्ष या पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. त्यामुळे इंदापूर तालुकाध्यपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांच्या भुवया उंचावल्या असताना रात्री उशीरा इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस च्या तालुकाध्यक्ष पदाची जाबाबदारी हनुमंत कोकाटे यांकडे सोपवण्यात आली. अशा निवडीचे पत्र पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांना सुपूर्त केले.

महारुद्र पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बहाल केलेले तालुकाध्यक्ष काढून घेण्यात आले असल्याची माहिती पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रकार परिषद घेत प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली. आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पक्षसंघटना वाढीच्या दृष्टिकोनातून आवश्यक बदल करण्याचे धोरण स्वीकारले आहे.या धोरणानुसार व पक्षश्रेष्ठीच्या मार्गदर्शनानुसार इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महारुद्र शिवदास पाटील यांना तालुका अध्यक्ष या पदावरून कमी करण्यात आले असल्याचा उल्लेख त्यात करण्यात आलाय.

१आँक्टोबर २०१८रोजी त्यांची तालुकाध्यक्ष पदी फेरनिवड करण्यात आली होती.मात्र यावेळी ही महारुद्र पाटील यांना पक्षांतर्गत विरोध झाला होता. मात्र २०२० ला पक्षानेच पाटील यांची पदावरून तडकाफडकी उचलबांगडी केल्याने उलट सुलट चर्चांना उत आलाय. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांना आज सकाळी त्यांच्या पदाचा राजीनामा मागितला होता. मात्र यावर पाटील यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपला रजीनामा दिला नाही अथवा कोणतेच लेखी उत्तर दिले नसल्याने गारटकर यांनी थेट पाटील यांना पदावरून कमी करण्याचा निर्णय घेत तसे पत्रक काढत महारुद्र पाटील यांची पदावरून तडकाफडकी उचलबांगडी केलीय. २०१८ दरम्यान इंदापूर तालुक्याची कार्यकारणी बदल करावी असा कार्यकर्त्यांमधून सूर होता. मात्र २०१९ ची विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन पाटील यांची तालुकाध्यक्ष पदी फेरनिवड करण्यात आली. जर पाटील यांना हटवले असते तर पक्षाला एकजूट बांधने अवघड गेले असते.त्यानुसार पाटील यांनीही संघटन बांधून पक्षाची ताकद वाढवली. जरी आज गारटकर सांगत असले कि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांना कमी केले आहे.मात्र नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. तोंडावर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तालुकाध्यक्ष पदासाठी मजबूत चेहरा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार का? आणि त्याच ताकदीने पक्ष पुढील वाटचाल करणार का ?असा सवाल यानिमित्ताने सर्वांपुढे उभा होता. मात्र शनिवार दि.२५रोजीचं तातडीने इंदापूर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी हनुमंत कोकाटे यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्रही त्यांना रात्री उशीरा देण्यात आले.

महारुद्र पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा न देता थेट पक्षानेच पाटील यांना पदावरून कमी केल्याने इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्यस्थितीला कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत गटबाजी तर नाही ना ? मगं अचानक पक्षश्रेष्टींनी असा तडकाफडकी निर्णय का घेतला ? आणि तडकाफडकी नवा तालुकाध्यक्ष ही नेमला या घटना अतिवेगाने घडल्याने विविध चर्चांना उधान आले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button