Indapur

कोरोना” पार्श्वभूमीवर इंदापूर महाविद्यालयाचा आगळावेगळा उपक्रम.

कोरोना” पार्श्वभूमीवर इंदापूर महाविद्यालयाचा आगळावेगळा उपक्रम.

दत्ता पारेकर पुणे जिल्हा प्रतिनिधी

पुणे: इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने जगभरात धुमाकूळ घातलेले व सर्वत्र चर्चेलेला ‘कोरोना ‘ व्हायरस पार्श्वभूमीवर एक आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. महाविद्यालयात येणारा प्रत्येक विद्यार्थी प्रवेशद्वारावरजवळ साबणाने स्वच्छ हात धुवन महाविद्यालयात प्रवेश करतो, दोन विद्यार्थ्यांमध्ये अंतर ठेवून त्याला प्रवेश दिला जात आहे तसेच या विषयी जनजागृती केली जात असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी दिली.

संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील,उपाध्यक्षा पद्मा भोसले, संस्थेचे सचिव मुकुंद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षार्थी विद्यार्थ्यांची कोरोना संदर्भात योग्य ती दक्षता घेण्यासाठीची उपाययोजना महाविद्यालयात करण्यात आली.

परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेमध्ये एक बाक सोडून एक विद्यार्थी याप्रमाणे त्यांची बैठक व्यवस्था देखील केली जाणार असल्याचे परीक्षा विभाग प्रमुख प्रा. आत्माराम फलफले यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button