सावित्रीबाई फुलेचे विचार जोपासणे काळाची गरज : समतादूत प्रज्ञा राजूरवाडे
चिमुर/प्रतिनिधी –ज्ञानेश्वर जुमनाके
आम्हा स्त्री वर्गाची आज जी प्रगती झाली ती फक्त सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे, त्यांनी केलेल्या स्त्री शिक्षण विषयक चळवळी मुळे. त्यांनी दाखवलेला स्वतंत्रच्या मार्गामुळे आमचा स्त्री वर्ग हा मानसिक गुलामीच्या जखडातून आता मोकळा स्वास घेत आहे. पण खरेच आपण त्यांच्या विचारानुसार मार्गक्रमण करत आहोत का? आज समाजात काही विकृती घडली की आपल्या मनात एक भीती निर्माण होते. सावित्रीबाई फुलेनि आपल्याना स्वतःचे रक्षण करण्यासाठी मजबुत केले आहे. सावित्रीबाई फुलेचे विचार जोपासणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी व्यक्त केले.
त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व महिला बालकल्याण चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनी अंगणवाडी क्र. १३ येथील आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नीता लांडगे तसेच प्रमुख पाहुणे महिला बालकल्याणच्या सुपरवायझर वनिता नरडे, मनीषा लांडगे, वैशाली खाटीक, पुष्पा हिंगे, किरण हिंगे, जयश्री मांडवकर, कीर्ती भलमे, काजल भलमे आदी उपस्थित होते.
समतादूत प्रज्ञा राजूरवाडे मार्गदर्शनात पुढे म्हणाल्या की, आपण आधुनिक झालो ते फक्त त्यांनी टाकलेल्या उंबरठ्या बाहेरच्या पाऊलामुळे त्यांच्या उदार अंतःकरनामुळे दुसऱ्याचे दुःख वेचल्यानी आणि आमचे कुपोषित विचार हे आज आम्हाला आधुनिक असुन ही अबला बनवत आहे. श्रेय वादाच्या लढाईत आम्ही मग्न आहोत. याचा विचार करणे गरजेचे आहे. समाजाची सेवा हेच त्यांचे ध्येय होते. तसेच या कार्यक्रमात स्वच्छतेवर मार्गदर्शन करून कोरोना व्हायरलबद्दल जनजागृती करून हाथ धुवा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला बार्टीच्या मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांची रिया कामडी व लीना कामडी यांनी वेशभूषा केली.
कार्यक्रमाचे संचालन अंगणवाडी सेविका माधुरी वीर यांनी केले. उपस्थितांचे आभार जयश्री कामडी यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.






