कुणबी समाज संघाची महिला कार्यकारणी गठीत
चिमुर/प्रतिनिधी –ज्ञानेश्वर जुमनाके
कुणबी समाज संघ तालुका चिमुर र. न. ६९/१८ एफ- १४८३२ च्या वतीने दिनाक १५ मार्चला माता अनुसया मंगल कार्यालयात झालेल्या सभेत तालुका महिला कार्यकारणी गठीत करण्यात आली. त्यात तालुकाध्यक्ष म्हणुन वैशाली शेंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या कार्यकारणीत तालुकाध्यक्ष म्हणुन वैशाली शेंडे, उपाध्यक्ष नीता कुरडकर, सचिव सुचिता शेषकर, सहसचिव लक्ष्मी सुहास ठावरी, कोषाध्यक्ष वर्षा ठुने, अध्यक्ष सांस्कृतिक कार्यक्रम संगीता खंगार, सहा, वंदना शेषकर, कार्यक्रम संचालन किरण उमरे, अध्यक्ष हैप्पी थाट मंगला ठाकरे, संघटिका जयश्री ठुसे, सदस्या म्हणुन शिल्पा जुनघरे, अश्विनी ठोंबरे, वर्षा कारमोरे, मंगला दुधनकर, उषा हिवरकर, सुनिता नवघडे, नलिनी पाचभाई, माधुरी आवारी, माला रामगुंडे, कोकिळा भोपे, माया घ्यार, सोनाली डुकरे, संगीता पवार आदींचा समावेश आहे.
सदरची कार्यकारणी प्रमुख कार्यवाहक भिमराव ठावरी, जिल्हा समन्वयक योगेश ठुने, अध्यक्ष डॉ. चंद्रभान खंगार, विजय फुकट, सचिव गजानन कारमोरे, सहसचिव रमेश भोयर, युवा तालुका अध्यक्ष अमोल जुनघरे, उपाध्यक्ष सुनील झाडे, रेन्गाबोडी प्रमुख व ता. का. स. मंगेश ठोंबरे, संघटक सुभाष शेषकर, सदस्य गोविंद तिजारे, रवींद्र नरुले, यादव आवरी, सुखदेव रामगुंडे, प्रवीण घ्यार, रामभाऊ दुधनकर, पद्माकर डुकरे, नारायण धोटे आदींच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन पदग्रहण सोहळा पार पडला. सदरच्या कार्यक्रमात अध्यक्ष भिमराव ठावरी म्हणाले की, संघटना ही सर्वात मोठी शक्ती आहे. हेवेदावे बंद करून निस्वार्थ भावनेने कार्य करत रहा. एकोपणे चला, मार्ग मोकळे होतील. कार्यक्रमाचे संचालन ग्रंथमित्र सुभाष शेषकर, प्रास्ताविक डॉ. चंद्रभान खंगार, आभार प्रवीण घ्यार यांनी मानले.






