आंतर राष्टीय क्रिकेट पटू गौतम गंभीर यांनी गडचिरोली जिल्ला चे ब्रँड अम्बिसिडेर होण्याची खासदार अशोक नेते यांची मागणी
चिमूर–ज्ञानेश्वर जुमनाके :-
दि 9 मार्च ॥ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तथा भाजपचे खासदार श्री गौतम गंभीर यांनी गडचिरोली जिल्ह्याचे ब्रँड आंम्बेसिडर होण्याची मागणी गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते व गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रणय खुणे यांनी नुकतीच दिल्ली येथे एका भेटी दरम्यान केली. भारत देशात मागास 12 जिल्ह्यातून गडचिरोली हा जिल्ला अतिमागास असुन गडचिरोली हाँ जिल्ला ची लोकसंख्या कमी असुन भूभागाने मोठा आहे . जिल्लात नक्षलवाद मोठा असुन नक्षल समस्येने जिल्ला ग्रासला आहे . वरील समस्येमुळे गडचिरोली जिल्लाचा फारसा विकास झॉलेला नाही . ऐथे माडिया व ओबीसी समाज गुण्यागोविंदाने राहतात . जिल्यात बारमाही सिंचनाची सोय होऊ शकणारे कारवाफा , तुलतुली धरणे अद्याप पूर्णत्वास आलेली नाही . तसेच रेगडि तलावाचा सुध्दा विकास झॉलेला नाही . रस्त्याचे कामे गडचिरोलीत फार मोठ्या प्रमाणात मंजूर असुन वनविभागाच्या आडकाठी धोरणामुडे ती सुध्दा मोठ्या प्रमाणत बंद आहेत . नक्षलि व वनविभागा मुडे रस्ता कामास गती येत नाही . जिल्यात शेती , आरोग्य , सिंचन , क्रिडा व कलेला वाव नाही . जिल्हातील मुलांमध्ये क्रीडासंस्कृती ओतप्रोत भरलेलि असुन सोयी-सुविधा व मार्गदर्शन नसल्याने गडचिरोलीतील मुले शीक्षण , क्रीडा व कलेत मागे आहेत . हि समस्या हेरूण गडचिरोलीचे लोकप्रिय खासदार श्री . अशोक नेते व कल्पक विचार सरनि व जिल्ला विकासाची धडपड असलेले युवा व्यक्तीमत्व व अति मागास भागात बारमाही रस्ते बांधकाम करणारे उद्योजक , गडचिरोली जिल्हा भाजपा उपाध्यक्ष श्री प्रणय खुणे यांनी आंतरराष्ट्रीय ( जागतिक ) दर्जाचे महान फलंदाज , आयपीएल मध्ये कोलकता नाईट रायडर्स चे कप्तान व आपल्या एका खेळाने भारताला विजय मिळवून देनारे हाइप्रोफाईल व्यक्तीमत्वं भाजपा खासदार श्री गौतम गंभीर यांची दिल्ली निवासस्थानी भेट घेतली व वरील समस्या अवगत केल्या .व गडचिरोलीचे ब्रँड अंबिसिडर होण्याची मागणी केली .गौतम गंभीर यांनी मागणीला सकारात्मक प्रतीसाद दीला . गडचिरोलीचे खासदार अशोक नेते व प्रणय खुणे यांना पुढील महिन्यात गडचिरोली दौऱ्याचे नियोजन करावे असे सुचविले .






