Ausa

तपसे चिंचोली जिल्हा परिषद शाळेत जागतिक महिला दिनालामहिलांचाच अपमान..

तपसे चिंचोली जिल्हा परिषद शाळेत जागतिक महिला दिनाला महिलांचाच अपमान.……औसा प्रतिनिधी प्रशांत नेटके८ मार्च हा दिन सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.पण लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील तपसे चिंचोलीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मात्र चुकीच्या पध्दतीने महिला दिन साजरा करण्यात आला.तपसे चिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या मनमानी कारभारामुळे महिला दिनाला बगल देण्यात आली. आज शाळेत माजी विध्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. शाळेत दोन शिक्षिका आणि एक सेविका आहेत त्यांना ऐन जागतिक महिला दिनाच्या दिवशी एका कोपऱ्यात बसवून त्या महिला शिक्षकांना अवमान सहन करावा लागला. 8 मार्च आज सर्वत्र महिलांचा मानसन्मान करून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पण जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या मनमानी कारभारामूळे महिला दिनाला बगल देऊन गावातील महिलांना सहभागी न करता पुरुष मंडळीला बोलावून महिला दिन साजरा करण्याचा अजब प्रकार घडला आहे.यासंदर्भात शाळेतील महिला शिक्षिका यांच्याशी संपर्क साधला असता असे सांगण्यात आले की महिला दिनाच्या दिवशी महिलांचा मानसन्मान न करता ,अपमानास्पद वागणूक देण्याचे काम संबंधित शिक्षकांकडून करण्यात आले आहे .तरी झालेल्या गैरप्रकारावर काय कारवाई करण्यात येईल ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button