श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून
सुरु आहे महाप्रसाद सेवा
कृष्णा यादव, अक्कलकोट (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व प्रमुख कार्यकारी विश्वीस्त अमोलराजे भोसले यांनी स्वामी भक्तांकरिता सुरु केलेली महाप्रसाद सेवा ही पाहवून धान्य झालो. न्यासाकडून ज्या प्रमाणात व ज्या प्रकारे सेवा केली जात आहे, त्याला तोड नांही. अशीच सेवा अखंड चालू राहावी असे मनोगत बिदर येथील प्रसिध्द साई प्रीत भालके व्यादेही हॉस्पिटलचे चेअरमन डॉ.सोमशेखर भालके यांनी व्यक्त केले.
ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना डॉ.सोमशेखर भालके म्हणाले की, कर्नाटक राज्यातच नव्हे तर संपूर्ण जगात असली व्यवस्था होणे नांही. मंडळाच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य शासन उद्दिष्टेला महत्व देत असून न्यासाकडून सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात आले. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्रीडाविषयक, आपदग्रस्तांना मदत आरोग्य विषयक इत्यादी विविध कार्यक्रम न्यासाच्या वतीने राबविले जातात तसेच शासनाच्या विविध उपक्रमांना हे न्यास वेळोवेळी सर्वोतोपरी सहकार्य करीत असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी डॉ.नागनाथ हेबळे कलबुरगी, योगिनाथ बिऱ्हाडे, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, प्रशांत साठे, एस.के.स्वामी, सतीश महिंद्रकर, अप्पा हंचाटे, शहाजी यादव, नामा भोसले, प्रकाश गायकवाड, धानप्पा उमदी, मुन्ना कोल्हे, दत्ता माने, अप्पू पुजारी, सोमनाथ कुलकर्णी, महांतेश स्वामी, गोविंदराव शिंदे, समर्थ घाडगे, सौदागर कोष्टी, धनंजय निंबाळकर, बलभीम कवडे, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.






