Indapur

इंदापूर-अकलुज मार्ग दुरूस्तीसाठी नागरिकांचे बांधकाम विभागास निवेदन

इंदापूर-अकलुज मार्ग दुरूस्तीसाठी नागरिकांचे बांधकाम विभागास निवेदन

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे–इंदापूर-अकलुज मार्ग दुरूस्तीसाठी नागरिकांचे बांधकाम विभागास निवेदन

इंदापूर : इंदापूर-बावडा-अकलूज मार्गावर अनेक लहान मोठे खड्डे पडले असून यामुळे वारंवार अनेक लहान मोठे अपघात झालेले आहेत. ५ नोव्हेबंर रोजी याबाबत इंदापूर बांधकाम विभागास दुरूस्ती करिता निवेदन ही दिले होते. त्यावर बांधकाम विभागाकडून पावले ही उचलण्यात आली मात्र हे खड्डे बुजवण्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप आता संतप्त नागरिकांनी निवेदनाव्दारे केला आहे. शिवाय तातडीने या मार्गाची दुरुस्ती देखील करावी अन्यथा जन आंदोलन केले जाईल अशी तंबीही बांधकाम विभागास निवेदनाव्दारे देण्यात आलीय.

हा राज्यमहामार्ग असून आता तो संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग म्हणून नव्याने चौपदरी रास्ता होणार आहे. या पालखी महामार्गाचे काम रखडलेले असून अस्तित्वामध्ये असलेल्या राज्यमहामार्गाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.अतिशय वाहतुकीचा असणारा हा रस्ता असून जवळपास दहा साखर कारख्याच्या उसाची वाहतूक सुद्धा या रस्त्यानेच होते. याच मार्गावरुन अकलूज-सराटी-बावडा आदी ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यीची संख्या सुद्धा मोठी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची थोडीफार डागडुजी केली मात्र हे काम निष्कृष्ट दर्जाचे झाल्याने नंतर त्यामध्ये अजूनच खड्डे पडले.अगोदरचं रस्ता अरुंद आणि त्यामध्ये खड्डयांचे साम्राज्य यामुळे अपघाताचे प्रमाण खूप वाढले असून दुचाकी स्वारांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत असल्याने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी इंदापुर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती मयुर पाटील यांच्या उपस्थितीत बवडा पंचक्रोशीतील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता के.टी.साळुंखे यांना लेखी निवेदन देण्यात आलेय.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button