वनगळी गावात पार पडला बालआनंदी बाजार
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
इंदापूर तालुक्यातील वनगळी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारेकरवस्ती येथील बालआनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उदघाटन बिजवडी ग्रामपंचयातीच्या उपसरपंच सौ.प्रियंका पांडुरंग पारेकर यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.विद्यार्थ्यांना सामान्यज्ञानाचा व्यवहारात वापर कसा करावा, बाजारातील व्यवहार कसे होतात त्याचबरोबर आपण शाळेत शिकलेल्या गणिती क्रियांचा वापर कसा करावा याबद्दल माहिती मिळावी या हेतूने शाळेने बाल आनंदी बाजाराचे आयोजन केले होते.

यासाठी शाळेतील शिक्षक श्री.संतोष घोडके व सौ.सविता पवार यांनी पूर्वतयारी केली.या भाजीबाजारात विविध भाज्या,फळे तसेच इडली,वडापाव,भेळ, भजी, पॅटीस व अन्य प्रकारचे खाऊ यांची अगदी रेलचेल होती या बाल आनंदी बाजारात ग्रामस्थ, महिला,पालक,विद्यार्थी यांनी खरेदीचा आनंद लुटला.यावेळी पाच हजार चारशे रुपयांची उलाढाल झाली.यावेळी बिजवडी गावचे माजी सरपंच हिरालाल पारेकर, अॅड अनिल पारेकर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसो पारेकर,पालक,शाळा व्यस्थापन समितीचे सदस्य ,माता पालक सदस्य,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






