सारोळा येथे बीज प्रक्रिया केंद्राचा आ. पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
उस्मानाबाद प्रतिनिधी:- प्रशांत नेटके
उस्मानाबाद: तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) येथील शेतकऱ्यांनी एकत्र येवून सुरू केलेल्या व्हीआरडी कंपनीच्या सोयाबीन बीज प्रक्रिया केंद्राचा आ. कैलास पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.७) शुभारंभ करण्यात आला. दरम्यान विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल आ. पाटील यांचा शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी एम. डी. गोसमगुंडे, प्रभारी कृषी अधिकारी एन. एस. जोशी, एस. के. कवठाळकर, एन. ए. लांबखाने, सहाय्यक कृषी अधिकारी ए. डी. बन्ने, एम. एम. माळकुंजे, बुलढाणा अर्बनचे व्यवस्थापक व्ही. एस. गिरी, व्हीआरडीचे व्यवस्थापकीय संचालक महादेव साठे, सोमेश्वर मंडिवाळ, रविंद्र तवले, अनिल चंदणे, श्रीकांत रणदिवे, पांडूरंग गुरव, हभप बबन मिटकरी महाराज, युवा नेते पंकज पाटील, सागर रणदिवे, नंदकुमार मसे, बापू परिट, जितेंद्र रणदिवे, आदींसह शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना आ. पाटील यांनी व्हीआरडी कंपनीच्या माध्यमातून माझी ओळख झाली. माझ्या आमदारकीमध्ये या कंपनीचाही वाटा राहिल्याचे प्रतिपादन आ. पाटील यांनी केले.







