हिंगनघाट येथील प्रा अंकिता पिसुंडे वर पेट्रोल टाकून जाळणाऱ्या कृत्याचा निषेध
मुख्यमंत्री यांना दिले निवेदन
चिमूर ज्ञानेश्वर जुमनाके
हिंगणघाट येथील प्रा अंकिता पिसुडे या शिक्षकी महिलेवर एका युवक नराधमांने भर चौकात पेट्रोल टाकून जाळण्याचा निंदनीय अमानवोय प्रकार केला त्या कृत्याचा निषेध करीत त्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करीत भाजप महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पायल कापसे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार चिमूर मार्फत निवेदन देण्यात आले.
प्रा अंकिता पिसुडे ही महिला हिंगणघाट येथील महाविद्यालयात शिक्षक म्हणून काम करीत असताना ती महाविद्यालयात जात असताना भर चौकात एका युवक नराधमांनाने तिच्यावर पेट्रोल टाकून जाळले हा प्रकार निंदनीय अमानवीय असल्याने या कृत्याचा निषेध व्यक्त करीत शासनाने आरोपीस कठोर कारवाई करीत फाशीची शिक्षा देण्यात यावी महिलांना संरक्षण देण्यात यावे याबाबत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना तहसीलदार चिमूर मार्फत निवेदन देण्यात आले असून यावेळी भाजप महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पायल कापसे नप गट नेता छाया कणचलवार माजी पस सदस्य माया ताई ननावरे नगरसेवक भारती गोडे मनीषा कावरे नगरसेवक हेमलता ननावरे रचना राजपूत प्रिया जयकर आशा मेश्राम अलका बोरतवार नाजमा शेख आदी उपस्थित होत्या






