मयुरसिंह पाटील यांच्या हस्ते पत्रकार संघाच्या पदाधिका-यांचा सत्कार
प्रतिनिधी दत्ता पारेकर
इंदापूर / प्रतिनिधी
‘जयहिंद फाऊंडेशन’च्या वतीने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिका-यांचा कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती मयुरसिंह पाटील यांच्या हस्ते आज (दि.२) सत्कार करण्यात आला.
यावेळी संघाचे अध्यक्ष डॉ. संदेश शहा, इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र कवडे देशमुख, शहराध्यक्ष सुरेश जकाते, वेब न्यूज पोर्टलचे अध्यक्ष शैलेश काटे, उपाध्यक्ष योगेश कणसे, अंगद तावरे, भारत शेंडगे, सिद्धार्थ मखरे आदींचा सत्कार करण्यात आला.






