हर्षवर्धन पाटील यांचे सोलापूर येथे सोमवारी व्याख्यान – शंकरराव मोहिते पाटील
व्याख्यानमाला
प्रतिनिधी दत्ता पारेकर
राज्याचे माजी सहकार मंत्री व सहकार क्षेत्रातील अभ्यासू नेते मा.हर्षवर्धन पाटील यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे सोमवार (दि.3) रोजी दुपारी 3.30 वा. ” ग्रामीण विकासात सहकाराचे योगदान ” या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृती व्याख्यानमाला- 2020 मध्ये हे व्याख्यान होणार आहे.
हर्षवर्धन पाटील हे कॉलेज जीवनापासूनच सहकार चळवळीत कार्यरत आहेत. राज्याचे सहकार, पणन मंत्री म्हणून काम करताना त्यांनी स्वतःच्या अभ्यासू नेतृत्वाचा वेगळा ठसा निर्माण केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलगुरू मा.डॉ.मृणालिनी फडणवीस उपस्थित राहणार असून प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.डॉ.विकास कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदर व्याख्यानाच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव प्रा.डॉ.विकास घुटे यांनी केले आहे.






