भारतीय संविधानाने महिलाच्या सन्मानाचे जगणे शब्दाकिंत केले : समतादूत प्रज्ञा राजूरवाडे
चिमूर/प्रतिनिधी –ज्ञानेश्वर जुमनाके
सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या हातात लेखणी देऊन शाळा काढून ज्ञानाचे दरवाजे खुले केले जिजाऊ यांनी महिलांना धाडस शिकवले व बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात महिला यांच्या सन्माना चे जगणे हिंदू कोड बिल देऊन सार्थक केले तरी या समाजजीवनात पुरुषयांच्या बरोबरीने स्त्रीया असल्या तरी काही काही महिला ह्या अजूनही वंचित का? अदृश्य का? याचा शोध घेणे गरजेचे आहे ज्या महिला व्यक्त होतात त्यांच्या सन्मान समाजात होतो का ?महिला आपले व समाजातील समस्या मांडताना सामाजिक न्याय या विषयावर चर्चा करतात का? स्त्रीयांच्या डोळ्यानि जग बघा ही आग्रही भूमिका मांडतात का? किती स्त्रीया ह्या मानसिक स्वतंत्र यावर जोर देतात? स्वतः च्या निर्णयाबाबत जागरूक पणे विचार आपण करतो का?हे स्वतः च स्वतःला प्रश्न विचारुन स्वतःला कश्या प्रकारे स्वतः आपण बघतो हे भूमिका घेताना फार महत्त्वाचे आहे तेंव्हाच जाणीवा तयार होऊन भूमिका घेतल्या जातात अश्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी समाजातील महिला यांच्या भूमिका या विषयावर ग्रामगीता महाविद्यालय व ग्रामपंचायत मालेवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना शिबीर या कार्यक्रमात बोलत होत्या.

पुढे त्या बोलताना म्हणाल्या की, या देशाची शान ही स्त्री शक्ती आहे तिने स्वतः ला ओळखने गरजेचे आहे तिच्या उदरिच जन्म घेतले इथल्या थोर महापुरुष यांनी तेव्हा स्त्री जन्माचे स्वागत करून मी एक स्त्री आहे या अस्तित्वाचा तिने अभिमान ठेवून एखादा दिवस साजरा करायला हवा.
या कार्यक्रमाच्या अद्यक्षस्थानी सरपंच पल्लवी शेंडे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सभापती लता पिसे, ग्राम पंचायत सदस्य शोभा नरुले, प्रा. संदीप सातव, प्रा. विजयकुमार शील, प्रा. प्रज्ञा खोब्रागडे ह्या उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. प्रतीक्षा मेहरकुरे यांनी केले तर संचालन प्रणिता पवार व आभार अमित खोब्रागडे यांनी मानले.






