एनआरसी विरोधात
वंचित आघाडी ने दिले उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन
एनआरसी कायदा रद्द करा .. अरविंद सादेकर
चिमूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके
केंद्र शासनाने नुकताच नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी अधिनियम पारित केल्याने आदिवासी दलित भटक्या जमाती अल्पसंख्याक इत्यादी समुदायात असहिष्णुता निर्माण होत असल्याने मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप वंचित आघाडी चे नेते अरविंद सा देकर यांनी करीत नागरिक सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी अधिनियम रद्द करण्याचे आवाहन केले
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र च्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंद पुकारण्यात आल्यावर चिमूर तालुका वंचित बहुजन आघाडी च्या वतीने पद यात्रा च्या माध्यमातून बंद करण्याचे आवाहन करीत भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक पासून शहरातून पद यात्रा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालय वर येऊन उपविभागीय अधिकारी संकपाळ यांना निवेदन देण्यात आले
निवेदन देत असताना वंचित बहुजन आघाडी चे नेते अरविंद सादेकर ,माजी राज्यमंत्री डॉ रमेशकुमार गजभे तालुका अध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे ,महिला तालुका अध्यक्ष बबिता गेडाम, शालीक थुल विनोद सोरदे, रामदास राऊत जनार्धन खोब्रागडे संदीप खोब्रागडे लहुजी पाटील वासुदेव गायकवाड विनोद देठे नीलकंठ शेंडे चंदू मडकवार बळवंत ठवरे वामन अंबादे परमानंद राऊत आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.






