सामाजिक कार्यकर्ते अनिल गलांडे ‘ग्रामभूषण’ पुरस्काराने सन्मानित..
दत्ता पारेकर
श्री.दत्त जन्मोत्सव मंडळ, कोंढारचिंचोली यांचे मार्फत देण्यात येणारा ग्रामभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते अनिल गलांडे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यशकल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ करे-पाटील, ह.भ.प.माऊली महाराज पठाडे, शेतकरी संघटनेचे नेते निळकंठदादा शिंदे, नाथसाहेब गलांडे, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रशालेचे प्राचार्य विक्रम राऊत, पंचायत समिती सदस्य
आणि नागनाथ लकडे, संजयअप्पा साळुंखे
उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते अनिल गलांडेना कोंढारचिंचोली ग्रामभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सामाजिक काम करत असताना निस्वार्थपणे सेवा देण्याचे काम गलांडे यांनी केले, म्हणून योग्य माणसाचा सन्मान झाल्याची भावना सर्व ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी करे-पाटील म्हणाले की, सामाजिक कार्यकर्ते
अनिल गलांडे यांची सेवा समाजासाठी प्रेरणादायी आहे,तसेच मा.श्री.संजयअप्पा साळुंखे यांनी सुरू केलेली विचारांची परंपरा करमाळा तालुक्यासाठी दिशादर्शक आहे.
श्री दत्त जन्मोत्सव मंडळ कोंढरचोंचोली यांच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते . श्री.दत्तमुर्ती प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रम, पौराहित्य ह.भ.प.वैभव महाराज जोशी यांचेहस्ते पार पाडण्यात आला.यावेळी श्री.दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
कार्यक्रमा निमित्त हनुमान भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला.त्याचप्रमाणे माऊली महाराज पठाडे यांनी किर्तन सादर केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे संयोजक संजय नानासो साळुंखे तसेच श्री.दत्त जन्मोत्सव मंडळ व ग्रामस्थांनी परीश्रम घेतले.






