अभ्यंकर मैदानावरील सभागृहास सावित्रीबाई फुले सभागृह नाव देणार …..आमदार बंटीभाऊ भांगडीया
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुतळा अनावरण
चिमूर तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मुळे महिलांना अधिकार मिळाला असून त्यांचे विचार आजतगाजत सातत्याने समाजात आचरण करण्याची गरज असल्याचे सांगत चिमूर येथील अभयंकर मैदानावर सभागृह असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह नाव देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी ग्वाही दिली.
महात्मा ज्योतिबा फुले माळी समाजसेवा मंडळ चिमूर च्या वतीने आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती तथा पुतळा अनावरण सोहळ्यात आमदार बंटीभाऊ भांगडीया बोलत होते .
यावेळी प्राचार्य एन एस कोकोडे , सरपंच रामदास सहारे वसंत वानखेडे भद्रीनाथ देसाई लिलाबाई नंदरधने माजी सभापती अतुल लोथे प्रा मोहुर्ले विविध कार्यकारी संस्था अध्यक्ष बाळकृष्ण बोबाटे राहुल बडवाईक बेंदेवार आदी उपस्थित होते .
दरम्यान क्रांतीज्योती सावित्रीबाई फ़ुले यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले . क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जीवन चरित्रवर गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली .
संचालन अनुप लोथे व संजय साखरकर यांनी केले .
बालाजी वानखेडे मनोहर नंदरधने प्रभाकर भुसारी मंगेश भुसारी नामदेव बोबाटे प्रभाकर दानव भाऊराव लोथे राकेश नंदूरकर संजय देसाई लोमेश बनकर गणेश लोथे प्रशात वानखेडे निशांत वानखेडे दीपक साखरकर सुरज बनकर राजेश देसाई दीपक साखरकर मोहन बनकर गजानन वानखेडे आदींनी परिश्रम घेतले .यावेळी माळी समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते .






