पंढरपुर शहर हद्दीतील वय वर्षे 60 पेक्षा जास्त असणाऱ्या सर्व जेष्ठ नागरिकांचे प्रथम डोस साठी कोविड 19 लसीकरण नांव नोंदणीकरण केंद्र सुरू
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपुर शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, उद्या दि 28 मे 2021 पासून सकाळी 8।30 ते
11।30 या वेळेत पंढरपुर शहर हद्दीतील वय वर्षे 60 पेक्षा जास्त असणाऱ्या सर्व जेष्ट नागरिकांचे प्रथम डोस साठी कोविड 19 लसीकरण नांव नोंदणी करणेकरिता पंढरपुर शहर हद्दीतील (1)कवठेकर प्रशाला, नाथ चौक, पंढरपुर (2) आदर्श प्राथमिक विद्यालय, वेदांत भक्त निवास समोर, पंढरपुर (3) द.ह.कवठेकर प्रशाला, तालुका पोलीस स्टेशन मागे, पंढरपुर (4) कर्मयोगी विद्या निकेतन, लिंक रोड, पंढरपुर या चार ठिकाणी नांव नोंदणी केंद्र उभारण्यात येत आहे. तरी पंढरपुर शहर हद्दीतील वय वर्षे 60 पेक्षा जास्त वय असलेल्या ज्या नागरिकांनी प्रथम डोस घेतलेला नाही त्यांनी वरील चार केंद्रावर जाऊन आपले लसीकरण करणेसाठी नांव नोंद करावी. नांव नोंदणी करण्यास जाताना आपले स्वतःचे आधारकार्ड, मोबाईल नंबर घेऊन जावे. ज्या नागरिकांनी प्रथम डोस घेतलेला नाही अशाच नागरिकांनी आपल्या नांवाची नोंदणी करावी आपणास नंबर नुसार टोकन देण्यात येईल.
*तसेच लसीकरण केंद्रावर खालील प्रमाणे टोकन नंबर देण्यात येत आहेत.*
(1)कवठेकर प्रशाला, नाथ चौक, पंढरपुर –
टोकन क्र 1 ते 100
टोकन क्र 401 ते 500
टोकन क्र 801 ते 900
(2) आदर्श प्राथमिक विद्यालय, वेदांत भक्त निवास समोर, पंढरपुर –
टोकन क्र 101 ते 200
टोकन क्र 501 ते 600
टोकन क्र 901 ते 1000
(3) द.ह.कवठेकर प्रशाला, तालुका पोलीस स्टेशन मागे, पंढरपुर –
टोकन क्र 201 ते 300
टोकन क्र 601 ते 700
टोकन क्र 1001 ते 1100
(4) कर्मयोगी विद्या निकेतन, लिंक रोड, पंढरपुर – टोकन क्र 301 ते 400
टोकन क्र 701 ते 800
टोकन क्र 1101 ते 1200
तरी नागरिकांनी लसीकरण नोंदणी केंद्रावर गर्दी न करता आपल्या जवळील केंद्रावर आपल्या सोई नुसार आपली कोविड 19 लसीकरण नांवाची नोंद करावी. नोंद झाल्यानंतर आपले टोकन सांभाळून ठेवावे. नागरिकाचा ज्या दिवशी कोविड 19 लसीकरणाचा नंबर येईल त्याच्या एक दिवस अगोदर नागरिकांच्या मोबाईल नंबर वर पंढरपुर नगरपरिषेदेमार्फत sms केला जाईल. त्या sms मध्ये नागरिकाचे नांव, कोविड 19 लसीकरणाचा दिनांक व वेळ नमूद असेल.त्या नुसारच नागरिकांनी लस घेणेसाठी अरिहंत पब्लिक स्कूल, मनीषा नगर, पंढरपुर या ठिकाणी हजर राहावे.
लस घेण्यासाठी जाताना आपले टोकन आणि आधारकार्ड सोबत ठेवावे.
महत्त्वाची सूचना
प्रत्येक नागरिकांना एकच टोकन मिळेल जे जेष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर येऊ शकणार नाहीत अशा व्यक्तीच्या घरातील व्यक्ती ज्येष्ठ व्यक्तींचे आधार कार्ड घेऊन नावांची नोंदणी करू शकेल पंढरपूर नगरपरिषद, पंढरपुर






