Nashik

दिंडोरी नगरपंचायती कडून शासनाच्या आदेशाला केराची टोपली.  व्यापाऱ्यांची उपविभागीय अधिकारी आहेर यांच्याकडे धाव

दिंडोरी नगरपंचायती कडून शासनाच्या आदेशाला केराची टोपली. व्यापाऱ्यांची उपविभागीय अधिकारी आहेर यांच्याकडे धाव

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यात कडक निर्बंध लादण्यात आले होते. याच काळात दिंडोरी शहरातील अनेक दुकाने नगरपंचायतीने सील केली होती मात्र एक 1 जून पासून शासनाच्या आदेशान्वये सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत खुली करण्याची मुभा मिळाल्या नंतर देखील नगर पंचायती कडून व्यापाऱ्यांवर हेतू पुरस्कर कारवाई करण्यात येत आहे. शासनाच्या आदेशाचे पालन करून दुकाने संबंधित व्यावसायिकांनी खुली केली आहे असे असतानां नगरपंचायत प्रशासन दंड वसूल करण्यासाठी तगादा लावत आहे. व्यापाऱ्यांवर होणारा अन्याय लक्षात घेता व्यापारी संघाच्या शिष्टमंडळाने उपविभागिय अधिकारी तथा नगरपंचायत प्रशासक श्री संदीप आहेर यांच्याकडे निवेदन देऊन सदर व्यावसायिकांना आकारण्यात आलेला दंड माफ करावा यासाठी निवेदन दिले. यावर उचित कारवाई करण्याचे आश्वासन प्रांत अधिकारी डॉ संदीप आहेर यांनी दिले. शिष्टमंडळात मनसे उपजिल्हाध्यक्ष मनोज ढिकले, दिंडोरी शहराचे युवा नेतृत्व रणजित देशमुख , मा नगराध्यक्ष सचिन देशमुख, शिवसेना शहरप्रमुख संतोष मुरकुटे, अँड प्रदीप घोरपडे , पत्रकार नितीन गांगुर्डे हे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button