रावेर

रावेरात अनिल चौधरी अपक्ष उमेदवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह. …

रावेरात अनिल चौधरी अपक्ष उमेदवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह.

विलास ताठे

रावेर तहसील कार्यालयात काल दिवसभर रावेर विधानसभा मतदारसंघात एकच चर्चेला उधाण आले होते, कि अनिल चौधरी अपक्ष उमेदवार यांचा अर्ज वैध ठरतो कि बाद होतो, पण दोन्ही पक्षांच्या मोठ्या युक्तिवादानंतर अजित थोरबोले यांनी अखेर अनिल चौधरी अपक्ष उमेदवार यांचा अर्ज वैध आहे, असा शिक्कामोर्तब केला. आणि अनिल चौधरी समर्थक या सर्वानी एकच मोकळा श्वास घेतला. मात्र त्यांच्या कमालीचा उत्साह संचारला, व त्यांनी अनिल चौधरी यांना आता रावेर चा आमदार करण्यासाठी सर्व परीने प्रयत्न करू आणि तेव्हाच दम घेवू असा सर्व कार्यकर्ते यांनी सूर उमटविला,यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सचिन चौधरी, धीरज चौधरी, निखिल चौधरी, माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद शफी, पंकज वाघ, अभिमन्यु चौधरी नगरसेवक, दुर्गेश ठाकूर, मनोज करणकार, सीताराम पाटील, रवींद्र महाजन राहुल कचरे, सागर चौधरी, नरेंद्र माळी, बबलू बारी राजू शेख, निखिल महाजन, संतोष चौधरी व इतर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button