Pandharpur

धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान मातोश्री मिनाताई ठाकरे प्रतिष्ठान व दयावान ग्रुप पंढरपुर यांच्यावतीने पोलीस कर्मचारी सफाई कामगार व बेघर लोकांना नाष्ट्याचे आयोजन

धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान मातोश्री मिनाताई ठाकरे प्रतिष्ठान व दयावान ग्रुप पंढरपुर यांच्यावतीने पोलीस कर्मचारी सफाई कामगार व बेघर लोकांना नाष्ट्याचे आयोजन

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर शहरामध्ये कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी कार्यालय कडून 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर शहरांमध्ये लॉक डाउन या काळामध्ये पोलीस कर्मचारी सफाई कामगार आपले आरोग्य धोक्यात घालून जीवाची बाजी लावत पंढरपूरच्या नागरिकांची सुरक्षा करत असतात त्या पार्श्‍वभूमीवर आपणही समाजाचं काहीतरी देणे लागत आहे म्हणून आनंद (दादा) संजय घोडके यांच्या स्वखर्चातून नाष्टाचे व पाण्याची बॉटल चे आयोजन करण्यात आले जोपर्यंत लॉक डॉउन असणार आहे तोपर्यंत हे आयोजन करत आहोत प्रमुख उपस्थिती म्हणून आनंद दादा घोडके जगन्नाथ जाधव राजू शिंदे शाम बनसोडे विशाल जाधव गणेश निंबाळकर श्री नवले पंकज मुसळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button