Amalner

ठोस प्रहारचा पाठपुरावा…! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी अतिवृष्टीचे अनुदान मंजूर…स्वयंघोषित भूमीपुत्रांनी ह्याचे श्रेय घेऊ नये…

ठोस प्रहारचा पाठपुरावा…! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी अतिवृष्टी चे अनुदान मंजूर…स्वयंघोषित भूमीपुत्रांनी ह्याचे श्रेय घेऊ नये…

अमळनेर येथे 2019 मध्ये अतिवृष्टिमुळे अमळनेर तालुक्यातील 52 गावांतील शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यात शेतकरी बांधवाना शासनाने नुकसान ग्रस्त गावाना मदत जाहीर करून दिली होती. पण दुर्दैवाने तालुक्यातील 32 खेडे हे नुकसान होऊनही शासकीय मदतीच्या लाभापासून वंचित राहिले होते. त्याचा पाठ पुरावा काही सुज्ञ शेतकरी शासन दरबारी करत होते. ही बाब मा. ना. गुलाबराव पाटील (पालकमंत्री जळगाव जिल्हा ) यांच्या प्रखरतेने लक्षात येताच शेतकरी हितासाठी त्यांनी भगीरथ प्रयत्न सुरु केला आणि त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळून अमळनेर तालुक्यातील 32 गावातील उपेक्षित शेतकरी बांधवाना नुकसान भरपाई शासनाने मंजूर केल्याने अमळनेर तालुक्याचे शेतकरी बांधव यांच्या कडून पालकमंत्री यांचे तोंड भरून कौतुक केले जात आहे.

विशेष म्हणजे ठोस प्रहारने आपल्या बातम्यांमधून सातत्याने हा विषय लावून धरला होता. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा ठोस प्रहार कडे मांडल्या होत्या.या संदर्भात स्थानिक विद्यमान आमदार यांना ठोस प्रहारने चांगलेच धारेवर धरले होते. तुमचं तेच ते सानुग्रहाच पालुपद लावू नका या भाषेत आमदारांनी शेतकऱ्यांची बोळवणी केली होती. अनेक शेतकऱ्यांनी या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया देखील दिल्या होत्या आणि त्या सर्व प्रतिक्रिया सह ठोस प्रहारने आपल्या बातम्यांच्या माध्यमातून विद्यमान आमदारांना वारंवार प्रश्न देखील केले होते. आता देखील स्थानिक आमदार हे नेहमीप्रमाणे दौऱ्यावर होते. त्यांना पत्ताच नाही आणि त्यांनी तालुक्यातील हा प्रश्न कधी ऐरणीवर घेतला नाही. पण तालुक्यातील जनता पालकमंत्री यांच्या कडे जाताच कोल्हे कुई ई ई ठोकत मीपण हा प्रश्न मांडला होता माझेही कौतुक व्हावे म्हणून काही चिल्लर कंपनी हाताशी घेऊन श्रेय लाटण्याचे काम सुरु आहे. अशी चर्चा गावात रंगत आहे. तसें श्रेय लाटण्याचे आणि जनते समोर बातम्या ठोकम -ठाक करण्याची त्यांची जुनी सवय जनता जाणून असल्याने जनतेने CM ह्या पदवीने नवाजले आहे.

तरी अमळनेर तालुक्यातील शेतकरी बांधव हुशार झाले असून प्रत्येकाच्या खिश्यात भ्रमणधव्हनि असल्याने थेट पालक मंत्री आणि मंत्रालय शेतकरी कक्ष्यात आल्याने CM ची चालाखी उघडी पडून नुकसान भरपाईचे सर्व श्रेय हे मा. ना. गुलाबराव पाटील (जळगाव जिल्हा पालकमंत्री )यांचे असून अमळनेर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी आभार प्रकटीकरणाचे फोन पालकमंत्री यांना गेल्याचे कळते.

तसेच शेतकऱ्यांनी ठोस प्रहारचे देखील आभार मानले असून रोखठोक बातम्या दिल्याबद्दल कौतुक देखील केले आहे.शेकडो शेतकऱ्यांनी भ्रमणध्वनी वरून ठोस प्रहारची पाठ थोपटली आहे.सदर बातम्या मा पालकमंत्री यांच्या पर्यंत देखील गेल्या असल्याने मा पालकमंत्री यांनी हा शेतकऱ्यांचा अत्यन्त जिव्हाळ्याचा विषय वेगात मांडून तो सोडविला देखील आहे.एक उत्कृष्ट लोकप्रतिनिधी काय करू शकतो हेच त्यांनी याद्वारे दाखवून दिले आहे. तालुक्यातील स्थानिक नेते मग ते आजी असो की माजी काहीच कामाचे नसल्याची चर्चा जोरदारपणे रंगली आहे.स्वयंघोषित भूमिपुत्र हे नावालाच भूमिपुत्र आहेत त्यांना भूमिपुत्र शेतकरी राजाच्या समस्यांशी काही घेणं देणं नाही अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button