Amalner

“ज्येष्ठ नागरिक समाज व देशाचे आधारस्तंभ”- डॉ मनिष जोशी

“ज्येष्ठ नागरिक समाज व देशाचे आधारस्तंभ”- डॉ मनिष जोशी

अमळनेर: “ज्येष्ठ नागरिक हे अनुभवांची खाण असून त्यांच्या व युवाशक्तीच्या समन्वयाने समाज व देश उभा राहू शकतो, ज्येष्ठ नागरिक हे आपले आधारस्तंभ आहेत” असे प्रतिपादन कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार सेवा विभागाचे संचालक डॉ मनिष जोशी यांनी केले.

&Quot;ज्येष्ठ नागरिक समाज व देशाचे आधारस्तंभ&Quot;- डॉ मनिष जोशी

धनदाई महाविद्यालयातर्फे आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर अध्यक्ष म्हणून धनदाई ज्येष्ठ नागरिक मंडळाचे प्रमुख व. ता. पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून माजी पोलीस आयुक्त व ज्येष्ठ नागरिक संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री डी.टी. चौधरी, धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डी. डी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रमोद पवार ,ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील ऍड. जी.जी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेत 150 जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला.

&Quot;ज्येष्ठ नागरिक समाज व देशाचे आधारस्तंभ&Quot;- डॉ मनिष जोशीदरवर्षी धनदाई महाविद्यालयामार्फत दिला जाणारा “जेष्ठ नागरिक सन्मान” यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावर कार्य करणारे डी. टी. चौधरी, शैक्षणिक क्षेत्रात योगदान देऊन पत्रा च्या साह्याने ऋणानुबंध निर्माण करणारे पारोळा येथील स.ध. भावसार, साहित्य क्षेत्रात योगदान देणारे गं.का. सोनवणे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे बन्सीलाल भागवत, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उभारणी प्रसंगी शासकीय पातळीवर मदत करणारे शिवलाल राजधर पाटील, वृक्ष लागवडीच्या क्षेत्रात कार्य करणारे किसन बाविस्कर तसेच विद्यार्थी संस्कार व धार्मिक क्षेत्रात कार्य करणारे रतिलाल भावसार यांना ज्येष्ठ नागरिक सन्मान देऊन गौरव करण्यात आला.

&Quot;ज्येष्ठ नागरिक समाज व देशाचे आधारस्तंभ&Quot;- डॉ मनिष जोशीयाप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त करताना श्री डी. टी.चौधरी यांनी आपले अनुभव कथन करत ज्येष्ठ नागरिकांचे संघटन ही आवश्यक बाब असल्याचे सांगितले . या संदर्भातील शासकीय भूमिका व ज्येष्ठ नागरिकांनी घ्यायची काळजी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. यानंतरच्या आरोग्यविषयक सत्रात डॉ सौरभ जैन यांनी जेष्ठांचे दंतआरोग्य या विषयावर तर डॉ रवींद्र जैन यांनी ज्येष्ठ नागरिकांचा आहार, जीवनसत्व व दैनंदिन व्यायाम याविषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या तृतीय सत्रात मास्टर ट्रेनर प्रा. अशोक पवार यांनी ज्येष्ठ नागरिकांनी विषयी 2007 च्या कायद्याची सविस्तर माहिती दिली. या कायद्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले संरक्षण, समाजाची, कुटुंबाची ,शासनाची भूमिका व विविध लाभ याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
समारोपीय सत्रात उपस्थित ज्येष्ठ नागरिकांपैकी प्रकाश पाटील वसंतराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले ही कार्यशाळा आम्हाला नवीन बळ देणारी असून यासारख्या उपक्रमांचे आयोजन होत राहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांनी महाविद्यालयातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी येत्या वर्षभरात विविध उपक्रम राबविले जातील असे आश्वासन दिले. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ भगवान भालेराव व प्रा किशोर पाटील यांनी काम पाहिले. तर कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.लीलाधर पाटील व डॉ शैलेश पाटील यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी डॉ राहुल इंगळे, प्रा. प्रशांत पाटील प्रा महादेव तोंडे, प्रा. रमेश पावरा, डॉ संगीता चन्द्राकर, प्रा.मीनाक्षी इंगोले, डॉ जयंतराव पाटील यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेचे आभार प्रदर्शन भगवान भालेराव यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button