Pandharpur

कासेगाव येथील रेशन दुकानदाराचा धंदा जोमात पण वरिष्ठ अधिकारी कोमात

कासेगाव येथील रेशन दुकानदाराचा धंदा जोमात पण वरिष्ठ अधिकारी कोमात

प्रतिनिधी.
रफिक आतार

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराकडुन होतीय रेशनकार्ड धारकांची पिळवणूक. बायोमेट्रिक मशीन वरती अंगठा उठून कार्ड धारकांची केली जाते फसवणूक. रेग्युलर मिळणारा माल कधीही महीन्यात दिला जात नसल्याने रेशन कार्ड धारकांमधुन नाराजी.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नसुरक्षा योजने अंतर्गत मोफत रेशनचे वितरण करताना पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील रेशन दुकानदारांचा रेशन कार्ड धारकांना माल न देताच कार्ड धारकांना सांगितले जाते की मोफतचा माल सरकारने बंद करण्यात आला आहे. आणि दोन रुपये आणि तीन रुपये दराने मिळणर्या मालात जादा पैसे आकारले जातात.एकाद्या काडॆ धारकांचा माल दहा किलो असला तरी त्याला आठ ते नव किलो दिला जातो. कार्ड धारकांना रेशन दुकानदारांच्या विरोधात तक्रार करायची असेल तर तक्रार बुक सुध्दा दिले जात नाही. रेशन कार्ड धारकांना मिळणार मालाची पावती ही मिळत नाही. पावती मागितली की त्या रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानदाराकडुन अरे रवी ची व शिवीगाळी वापरली जाते. कोणी तहसील कार्यालय जाऊन तक्रार केली तरी त्याची माहिती पुरवठा अधिकारी देत नसल्याने आणि तक्रार केली तरी ही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने रेशन कार्ड धारकांना कधी मिळणार न्याय. स्वस्त धान्य दुकानदाराना कोणाचा पाठबळ आहे की काय कोण घालते पाठीशी कधी थांबणार रेशन दुकानदारांकडुन कार्डधारकांची पिळवणूक कधी थांबणार काळ्या बाजारात जाणारा रेशनचा माल. पुरवठा अधिकारी तर नसणार वरद हस्त. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार कार्ड धारकांना. गोर गरिबांना मिळणाऱ्या मालाची चौकशी करून गावातील स्वस्त धान्य दुकानदारावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी कासेगाव येथील ग्रामस्थांमधून होत आहे
व जिल्हा पुरवठा अधिकारी याकडे लक्ष देणार का असा सवाल विचारला जातोय

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button