Motha Waghoda

??ठोस प्रहारचा दणका..शौचालय दुरुस्तीकरीता ग्रा.प.वर महिलांनी मोर्चा आणताच दुरुस्तीचे काम सुरू.. उपसरपंचांनी घेतली दखल तरीही सरपंच गैरहजरच

शौचालय दुरुस्तीकरीता ग्रा.प.वर महिलांनी मोर्चा आणताच दुरुस्तीचे काम सुरू
उपसरपंचांनी घेतली दखल तरीही सरपंच गैरहजरच

महिलांनी मानले ठोस प्रहार चे आभार

प्रतिनिधी मुबारक तडवी

मोठा वाघोदा येथील निंभोरा रोडवरील वार्ड नं.३ मधील आंबेडकर नगरातील महिला शौचालयाची २ वर्षांपासूनची दुरावस्था व वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायतीकडून केले गेलेले दुर्लक्ष आणि अनेक समस्यांना सामोरं जात असलेल्या परिसरातील रहिवासी महिलांच्या सहनशीलतेचा बांध फुटला व नारीशक्ती ने थेट ग्रामपंचायतीवर धडक देत उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य याचं समोर समश्याचा पाढाच मांडला आणि सतत गैरहजर लोकनियुक्त सरपंच यांचे निष्क्रिय बेजबाबदारपणा कार्यपद्धती बद्दल तीव्र रोष व्यक्त केला होता मात्र उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी व सदस्य मुबारक तडवी यांनी महिलांच्या समस्यांची जाणीव असून समजुत काढत तात्काळ शौचालयावरील फुटलेली टिनपत्रे बदलविण्याचे काम लगेचच सुरु केले मात्र लोकनियुक्त सरपंच यांनी ग्रामपंचायतीकडे फिरविलेली पाठ ,सतत गैरहजर, बेजबाबदार कार्यपद्धती बद्दल गावकऱ्यांत तीव्र संतापाची लाट पसरली आहे व नापसंती व्यक्त केली जात आहे अशा कामचुकार कर्तव्यात कसूर करणाऱ्या, कर्तव्याची जाणीव नसलेल्या कर्महीन लोकनियुक्त सरपंच यांना पदमुक्त करावे आणि मोठा वाघोदा ग्रामपंचायती सह ग्रामस्थांना त्राणमुकत करावे अशी मागणी गावकर्यांतून होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button