? Crime Diary..भयानक..भर दुपारी 6 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
धुळे राहुल साळुंके
चाकूड ता.शिरपूर ह्या गावतील थरारक व अंगाला काटा आणणारी घटना एकूणच कोणाचेही रक्त खवळायला वेळ लागणार नाही अशी खूपच भयंकर आणि शरीराला हादरे निर्माण करणारी निर्दयी घटना घडून आली. ठिकाणी भारतात कुठेही मुलींवर असला वेळ, काळ, प्रसंग,अन्याय होतो तेव्हा आपण रस्त्यावर उतरतो, मेणबत्त्या लावतो अन आपला समाज अजून का एवढा गाड झोपेत आहे.? सध्या आपल्याला त्या पीडित परिवाराला व त्या नाजूक कोवळ्या पाखराला ,मुलीला धीर द्यायची वेळ आहे.
आज आपल्या समाजातील एक कोवळ्या ६ वर्ष्याच्या मुलीवर असा घात झालाय जीचे अजून दुधाचे दात पडायचे बाकी आहेत अन असा प्रसंग जो फक्त तिच्या परिवाराला कळेल तिला तिच्यावर काय घात झालाय ते सुद्धा तीला माहीत नाहीये अन असा घात होणे आपल्या समाजाची मान खाली गेल्याशिवाय राहणार नाही अशी घटना चाकूड येथे भर दुपारी आई, वडील शेतात गेल्याने एक ६ वर्षीय बालिका शेतात आजी सोबत आपल्या शेतातील विहिरीवर गेली असताना एक २५ वर्षीय निर्धयी नाराधमाने त्या ६ वर्षीय बलिकेवर बलात्कार असे दुष्कर्म केले आहे. माहिती मिळताच संबंधित पीडित बलिकेला, आई-वडील व त्या परिवाराला शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जयस महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. हिरा पावरा, बिरसा ब्रिग्रेड सातपुडा विभाग अध्यक्ष पोलीस पाटील सुंदर पावरा आणि बिरसा ब्रिग्रेड चे तालुका कोशाध्यक्ष डॉ सुनिल पावरा व इतर पदाधिकारी यांनी घडलेला घटनेची विचारपूस केली आणि सांगवी पोलीस स्टेशन चे API श्री अभिषेक पाटील साहेब ह्यांच्याशी चर्चा करून संबधीत आरोपींवर लवकरात लवकर निष्पक्ष चौकशी होऊन लवकरात लवकर फास्टट्रॅक कलम३७६ पास्को गुन्हा अंतर्गत कार्यवाही करून जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली आहे तसेच त्या पीडित परिवाराला निष्पक्ष चौकशी व न्याय मिळेपर्यंत सर्व आदिवासी संघटना मिळून ह्या विष्ययावर चर्चा करून ह्या घटनांना आळा कसा बसवता येईल ह्यावर लवकरच चर्चासत्र आयोजित करण्याचे आवाहन केले आहे.






