पंढरपूर तालुका परीट समाजाच्या तालुकाध्यक्षापदी गणेश ननवरे यांची निवड
प्रतिनिधी रफिक आत्तार
पंढरपूर तालुक्यातील आव्हे या गावांतील सामाजिक कार्यकर्ते गणेश ननवरे यांची पंढरपूर तालुका परीट समाजाच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.त्यांनी आजपर्यंत परीट समाजाच्या विविध
आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून समाजाच्या मागण्या शासन दरबारी मांडून सोडवण्याचा प्रयत्न केला. तळागाळातील समाज बांधवांना गाडगेबाबांच्या या विचाराने एकत्र आणून दिशा देण्याचे काम केलं.परीट समाजाच्या विविध संघटना एकत्र येऊन स्थापन झालेल्या महाराष्ट्र परीट धोबी आरक्षण समन्वय समितीच्या सदस्य म्हणून काम करत आहेत.सोलापूर जिल्हा परीट समाजाचे अध्यक्ष मा श्री संजय मामा घोडके यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.यावेळी सोलापूर जिल्हा परीट समाजाचे सचिव दत्तात्रय क्षिरसागर, महाराष्ट्र परीट शासकीय निमशासकीय सघंटना राज्य संघटक दयानंद पवार, महाराष्ट्र परीट समाजाचे प्रवक्ते सोमनाथ गायकवाड, पंढरपूर परीट समाज शहर अध्यक्ष विजय वरपे, पंढरपूर शहर युवक अध्यक्ष रामेश्वर सांळुखे, पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब घोडके, कैलास नवले, अमित गायकवाड, आनंद घोडके, विशाल घोडके, दिगंबर गायकवाड, पवन घोडके, आप्पा राऊत, माऊली गायकवाड, सुनिल कांरडे, वैभव ननवरे, गणेश ननवरे, समाधान पवार,आदी परीट समाज बांधव उपस्थित होते.






