Pandharpur

पत्रकार संरक्षण समिती पंढरपूर ची नुतन कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी जाकीर नदाफ व कार्याध्यक्षपदी तानाजी जाधव

पत्रकार संरक्षण समिती पंढरपूर ची नुतन कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी जाकीर नदाफ व कार्याध्यक्षपदी तानाजी जाधव

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेची पंढरपूर शहर व तालुका वार्षिक सर्वसाधारण सभा आज संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष भगवान वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पंढरपूर शहर व तालुक्यातील नुतन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली.अध्यक्षपदी जाकिर नदाफ, कार्याध्यक्षपदी तानाजी जाधव तसेच उपाध्यक्षपदी संतोष कांबळे व शंकरराव कदम, सचिवपदी शंकरराव पवार, सहसचिवपदी नामदेव लकडे, खजिनदारपदी सचिन दळवे, प्रसिद्धी प्रमुखपदी लखन साळुंखेे यांची निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष श्रीकांत कसबे, विरेंद्रसिंह उत्पात, राजेश शिंदे व माजी पदाधिकारी यांचे हस्ते सर्व नुतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जेष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे, माजी उपाध्यक्ष उमेश टोमके, माजी कार्याध्यक्ष डॉ. राजेश फडे, माजी उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव, तानाजी सुतकर, डॉ. शिवाजी पाटोळे, गणेश देशमुख, जैनुद्दीन मुलाणी, गौतम जाधव,धीरज साळुंखे, शरद कारटकर, आनंद भोसले, गणेश गायकवाड, प्रकाश इंगोले, संजय हेगडे, अशोक पवार इत्यादी सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button