Pandharpur

पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विकास पवार ; कार्याध्यक्षपदी राजकुमार शहापूरकर व उपाध्यक्षपदी विक्रम कदम, संजय कोकरे यांची निवड

पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विकास पवार ; कार्याध्यक्षपदी राजकुमार शहापूरकर
व उपाध्यक्षपदी विक्रम कदम, संजय कोकरे यांची निवड

पंढरपूर -रफिक अत्तार
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न पंढरपूर पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी दै.ललकारचे विकास पवार, कार्याध्यक्षपदी सा.पंढरी वार्ताचे राजकुमार शहापूरकर, उपाध्यक्षपदी दै.आपलं महानगरचे विक्रम कदम, दै.माणदूत एक्सप्रेसचे संजय कोकरे यांची निवड करण्यात आली. सदरची बैठक शनिवार दि.4 जानेवारी रोजी पत्रकार भवन पंढरपूर येथे संस्थापक हरिभाऊ प्रक्षाळे, महेश खिस्ते यांच्या अध्यक्षतेखाली व पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यामध्ये नुतन सचिवपदी दै.महासत्ताचे दिनेश खंडेलवाल, खजिनदारपदी दै.पंढरीभुषणचे प्रविण नागणे, सहखजिनदारपदी रफिक आतार, कार्यकारिणी सदस्यपदी समाधान भोई, नेताजी वाघमारे, गोपिनाथ देशमुख, सचिन कांबळे, महेश कदम, विश्वनाथ केमकर, सचिन दळवी, राजेश काळे यांची निवड सर्वानुमते जाहीर करण्यात आली. तसेच मार्गदर्शक सल्लागार समितीमध्ये दै.पुण्यनगरीचे महेश खिस्ते, अशोक गोडगे, सा.ज्ञानप्रवाहचे डॉ.राजेश फडे, सा.धन्यवादचे शंकरराव कदम, दै.पंढरी संचारचे अनिरूध्द बडवे, टीव्ही9चे रवि लव्हेकर यांची निवड करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button