विदुयत महामंडळ यांच्या हलगर्जीपणा मुळेच माणि येथील युवकाचा दुर्देवी अंत
विजय कानडे
माणी ता सुरगाना येथील विजय रमेश काहांडोळे यांचा विजेचा काम कोसळून शॉक लागल्याने दुर्दैवी अंत झाला असून कमवता मुलगा गेल्याने त्यांच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून हा वीज महामंडळाचा हलगर्जीपणा असून संबंधित
महामंडळावरती कठोर कार्यवाही करावी असे सुरगाणा येथील नगरसेवक रमेश थोरात यांनी तहसीलदार विजय सुयंवशी याच्याकडे निवेदन याद्वारे केली.
बरेच पोल( विजेचे खांब )पडण्याचा स्थितीत असून व गावोगावी डी पी ची परिस्थिती अत्यंत वाईट आहे केव्हाही विजेचा करंट जमिनीत उतरतो आणि परिणामी गरीब माणसाचा जीव जातो तरी संबंधित वीज ना मंडळा वरती योग्य ती कारवाई करावी अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल विदुयत महामंडळ यांच्या हलगर्जीपणा मुळेच माणि येथील युवकाचा दुर्देवी अंत सदर यांच्यावर कार्यवाही करावी मागणी-रमेश थोरात(नगरसेवक)






