ग्रामपंचायत मधील प्रलंबित कामे त्वरित करावीत ग्रामस्थांची मागणी
विजय कानडे
सुरगाणा गाव कमिटी तोरणडोंगरी, चे अध्यक्ष आनंदा महारु गावित सचिव, जयराम मोहन गावित तसेच गावातील प्रमुख ग्रामस्थ व तरुणांनी आज कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट नितीन पवार आमदार यांचे नाशिक येथील कार्यालयात भेट घेऊन ग्रामपंचायत अलंगुन अंतर्गत विविध प्रलंबित कामांच्या मागणीबाबत निवेदन दिले.
यात प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची नवीन योजना करणे, पाझर तलावातील गाळ काढणे, नवीन पाझर तलाव बांधणे,गावांतर्गत रस्ता करणे इ. विविध विकास कामे करण्यासंदर्भात मागणी केली असता आमदार साहेबांनी निवेदनातील समस्या मान्य करत लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या भेडसावत असल्याची व्यथा यावेळी गावकऱ्यांनी मांडली. यावर निवेदनातील मागण्या प्राधान्याने मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार साहेबांनी दिले तसेच राष्ट्रवादी युवक अध्यक्ष हे नेहमी युवकांचे तसेच ग्रामस्थ यांचे काही काम ते नितीन भाऊ पवार यांच्या पर्यत कैफियत मांडतात तो पाण्याचा प्रश्न असो,रस्त्याच्या, शिक्षणाचा राजू पवार पाठपुरावा करतात
यावेळी आनंदा महारु गावित,जयराम मोहन गावित, रघुनाथ हरी भुसारे , रघुनाथ गावीत, कैलास भुसारे, देविदास जाधव, चिंतामण भुसारे, अशोक भुसारे, सुनिल भुसारे, श्रीराम जाधव, कांतीलाल शिंगाडे, योगेश खांडवी उपस्थित होते.






