Ratnagiri

कृषी विद्यापीठ दापोली प्राध्यापक नियुक्तीची चौकशी करा.

कृषी विद्यापीठ दापोली प्राध्यापक नियुक्तीची चौकशी करा. रत्नागिरी: डाॅ.प्रकाश शिनगारे प्राध्यापक कृषी विद्यापीठ दापोली यांच्या नियुक्तीची चौकशी करा,अशी मागणी कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डाॅ.संजय सावंत यांच्या कडे सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, डाॅ.प्रकाश शिनगारे प्राध्यापक यांची पाञता नसताना म्हणजेच अपाञ असतानाही त्यांची नियुक्ती कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे प्राध्यापक पदी नियमबाह्य नियुक्ती देण्यात आली आहे. अशी तक्रार आहे. या नियुक्ती बाबत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडून देखील कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथून माहिती मागविण्यात आली आहे. सदर उमेदवार जाहीरात प्रसिद्ध झाल्यानंतर शेवटच्या दिवशी त्या पदाकरता पाञ नव्हते.त्यांना मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पाञ ठरविण्यात आले. यात मोठी गडबड झालेली स्पष्ट दिसून येत आहे. तरी या प्राध्यापक नियुक्ती बाबत तात्काळ चौकशी होऊन पाञ उमेदवारांना न्याय देण्यात यावा. अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी कुलगुरू डाॅ. संजय सावंत ,कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या कडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button