पंढरपुरात तातडीने कोविड —19
हाॅस्पिटल सुरु करावे अशी मागणी मनसैनिकांनी केली व प्रांताधिकारी निवेदनाद्वारे केले
प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूर,ता.29- सोलापूर शहरानंतर आता पंढरपूर शहर व परिसरातील तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात घबराट पसरली आहे. कोरोना बाधीत आणि संशियत रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी पंढरपुरात तातडीने कोविड -19 रुग्णालय सुरु करावे अशी मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणी तथा शॅडो सहकार मंत्री दिलीप धोत्रे यांनी केली आहे. या संदर्भात श्री.धोत्रे यांनी आज प्रांताधिकारी सचिन ढोले यांची भेट घेवून लेखी निवेदन दिले आहे. कोविड रुग्णालय उभारण्यासाठी काही मदत लागल्यास मनसेच्या वतीने मदत देखील दिली जाईल असेही त्यांनीयावेळी स्पष्ट केले.दोन दिवसापूर्वी पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या पाच झाली आहे. भविष्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजने करणे गरजे आहे. मुंबई व पुणे या रेड झोन भागातून पंढरपूर शहर व तालुक्यात मोठ्या संख्येने लोक आले आहेत. त्यांच्यामध्येच कोरोनाची लागण झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे. भविष्यात कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी कोविड केअर सेंटरची संख्या देखील वाढवावी लागणार आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे सोलापुरात तातडीने सर्वच रुग्णांवर उपचार करणे अशक्य होणार आहे. त्या दृष्टीने पंढरपूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे बाहेर गावाहून येणार्या नागरिक आणि भाविकांची संख्या जास्त आहे.या शिवाय माढा,माळशिरस, सांगोला,मंगळवेढा या तालुक्यातील नागरिकांसाठी देखील पंढरपूर हे सोयीचे ठिकाण आहे.
प्रशासनाने चंद्रभागानदी पलिकडील 65 एकर, एमआयटी काॅलेज( वाखरी) या ठिकाणी कोरोना बांधीत व संशयित रुग्णांवर उपचार सुरु करण्याची सोय करावी. या बरोबरच पंढरपुरात स्वॅब चाचणी प्रयोग शाळा देखील तातडीने सुरु करावी अशी मागणीही श्री. धोत्रे यांनी आपल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, उप्रमुख महेश पवार,सागर घोडके आदी उपस्थित होते.






