माझी लढाई व्यवस्था परिवर्तनासाठी आम आदमी पार्टी सचिव नागेश पवार
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपुर मधील आजतागायत आपण सर्वच जण
नगरपालिकेच्या फिलटरचे पाणी पितो..मोठ्या आनंदाने. पण हे पाणी कसे आहे याचा आपल्याला तसूभरही अंदाज नाही.मि सांगतो.हे पाणी चंद्रभागनदी पात्रातुन उचलले जाते ज्यामध्ये इसबावी येथील ओढ्याचे मैला मिश्रित गटारिचे पाणी आणि इतर प्रकारचे दुषीत पाणी मिसळले जाते.तेच पाणी फिलटर करुण आपणास पाजले जाते याला जबाबदार कोण?आहो यामुळे नागरिकांनाचा खिसा रोज 30 रु ने जारच्या पाण्यासाठी रिकामा होत आहे. याला जबाबदार कोण? आपण निवडुन दिलेले प्रतीनिधीच?.विचारा जाब त्यांना विविध योजनांसाठी आलेला निधी कुठे आहे ?तिर्थक्षेत्रासाठी आलेला विषेश निधी, कुठे गेले सर्व फंडस,ज्या प्रमाणात फंडस् आले तशी रस्ताची क्वाॅलीटी आहे का?चला बघुया तपासुन,पहिल्यांदा पदमावती बागेच्या मागील बाजूस जो रस्ता केलाया तो मुळात डांबरात आहे का कशात आहे हे समजतच नाही.आणि सर्वच रस्ते आशा प्रकारचे आहेत.आणि मला कळाले की हायब्रीड रस्ताची मागणी केली आहे नेते मंडळी यांनी. करु द्या त्यात काय गैर नाही.पण हायब्रीड रस्ताची मागणी कशासाठी? हेच मला समजले नाही? कारण ऐवढे पंढरपूर मध्ये रस्ते झाले त्याच्या क्वॅलीटी बद्दल कोणच नेते मंडळी बोलत नाही. सामान्य माणसाला पण सहज बघीतले तरी कळतय की रस्ता काय क्वॅलीटीचा आहे.आहो निवडणुका आलेत म्हणुन हा सर्व खटाटोप चालु आहे का?आहो काही शहराच्या भागामध्ये अवश्यकता नसताना चक्क कॅक्रीटचे कारस्थाना केले कशासाठी.आता बघा 2200 घरकुलंचा प्रश्न घ्या,कुठे बांधले ही घरकुले पुरनियंत्रण रेषेत,आता मला सांगा आविष्यभर त्या ठिकाणी पुराचे पाणी आले की द्या भरपाई म्हणजे शासणाची पुन्हा तिजोरी चुकीच्या नियोजणा मुळे खाली होत आहे…असाच प्रकारची एक मध्य प्रदेश यात्री भवण इमारत आज कितेक वर्षे धुळ खात पडली आहे ना इलाजस्तव टिका होऊ नये म्हणुन किरकोळ वापरासाठी दिली जात आहे .या 2200 घरकुलांच्या 26 जानेवारी दिवशीच्या सोडतीलाच विरोध होत आहे . याला काय म्हणावे ?आहो येथे श्रेय वादच आडवा येतोय,ज्यावेळी या चुका निदर्शनास आल्या,काही अभ्यासु पत्रकार यांनी या गोष्टी निदर्शनास आणून दिले त्याच वेळी का दुरुस्त्या केल्या नाहीत.आशा अनेक गोष्टी आहेत. पण त्या क्रमशः*माझी तमाम बंधूं भगिनींना नम्रविनंती आहे जर व्यवस्था परिवर्तन घडवून आणायचे असेल तर तुम्ही राजकीय क्षेत्रात उतरले पाहिजे. आणि नेतृत्व केले पाहिजे व उत्कृष्ट नेतृत्व व विचाराला खंबीरपणे साथ दिली पाहिजे.आपला सचिव नागेश पवार आम आदमी पार्टी पंढरपूर मंगळवेढा






