चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
पाटबंधारे उपविभाग चोपडा कार्यालयातून लाभक्षेत्र दाखला देण्यासाठी४००रुपयांची लाच मागणाऱ्या कालवा निरीक्षक विजय गीरधर पाटील(वय५७रा.हतनूर कॉलनी चोपडा) लाच स्वीकारताना आज दुपारी साडेचार वाजता चोपडा कार्यालयाचा आवारात जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली या घटनेने पाटबंधारे खडबळ उडाली
चोपडा तालुक्यातील ७०वर्षीय तक्रारदार व त्यांचा भाऊबंदकीच्या नावे असलेल्या वडिलोपार्जित शेतीची खतेफोड करण्या करता लाभक्षेत्र दाखला हवा असल्याकारणाने चोपडा कार्यालयात शुक्रवारी संपर्क साधल्या नंतर आरोपी कालवा निरीक्षक विजय गिरधर पाटील यांनी चारशे रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याकारणाने त्यांनी जळगाव एसीबी कडे तक्रार दिली. लाचेची पडताळणी झाल्यानंतर उपअधीक्षक जी.एम. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलेश लोथी व संजोग बच्छाव, मनोज जोशी, प्रशांत ठाकूर, कॉन्स्टेबल पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर. आदींच्या पथकाने आरोपीला लाच घेताना कार्यालयाचा आवारात पकडले







