डोमगाव शिवारातील उभी ज्वारीच्या पिकांची रानडुकरांकडुन नासधुस शेकडो एकर मधील ज्वारीचे नुकसान
राणुडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
सुरेश बागडे
परंडा ( सा.वा ) दि. १०
चवदार रब्बी ज्वारीसाठी प्रसिद्ध असलेल्या परंडा तालुक्यात यंदा परतीच्या पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीची मोठया प्रमाणावर पेरण्या केल्या आहेत या
ज्वारीच्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव तर पडला आहे. मात्र डोमगाव शिवारातील भारी प्रतिच्या जमीनी आहेत. या भागातील शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी उशीराने केल्यामुळे या शिवारातिल ज्वारी चांगली आहेत मात्र गेल्या कांही दिवसा पासुन राणडुकरांचे मोठ मोठे कळप उभी ज्वारीच्या पिकांना खाली पाडुन शेकडो एकर मधील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान केली आहे. या राणडुकराचा बंदोबस्त करण्याची मागाणी १ोतकर्यातुन केली जात आहे
तालुक्यात यंदा रब्बी ज्वारीची ९० टक्केच्या जवळपास पेरणी झालेली आहे .
ती अवेळी पावसामुळे ज्वारीला ज्यास्त पाणी लागत नाही. मात्र ज्वारीवर ही चिकटा. करपा. बुरुशी प्रादुर्भाव आहे. त्यामुळे ज्वारीच्या उत्पादनात घट येत आहे.
सध्या तालुक्यात ज्वारीच्या काढणी सुरु आहे . सिना कोळेगाव धरण परिसरातील ज्वारीची पिक चांगले आहे. मात्र रानडुकरांच्या नुकसानीमुळे १ोतकऱ्यांच्या पदरात पडणारे पिकांचे नुकसान पाहुन १ोतकरी हतबल झाले आहेत. प्रशासणाने राणडुकरांचा बंदोबस्त करावा अशी
मागणी डोमगाव येथील चंद्रहास काळे , गोरख साबळे , नाना साबळे, महेश नरसाळे, परमेश्वर साबळे या १ोतकऱ्यांची आहे.






