Yawal

यावल शहरात भर दुपारी सोन्या चांदीच्या दुकानात पडलेला दरोडा हे यावल पोलिसांचे अपयश कार्यवाही करण्यासाठी उपोषण करू..काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलीलदादा पटेल यांचा आक्रमक पवित्रा

यावल शहरात भर दुपारी सोन्या चांदीच्या दुकानात पडलेला दरोडा हे यावल पोलिसांचे अपयश कार्यवाही करण्यासाठी उपोषण करू,,, काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलीलदादा पटेल यांचा आक्रमक पवित्रा

शब्बीर खान यावल

यावल : यावल शहरात भर दुपारी गर्दीच्या ठिकाणी खुलेआम सोन्या चांदीच्या दुकानात दरोडा पडतो आणि यावल पोलीस स्टेशन येथील काही अधिकारी हे फक्त सट्टा, पत्ता , देशी विदेशी हातभट्टी दारू विक्रीला समर्थन करून हफ्ते वसुलीच्या नादात मग्न असल्याने चोरट्यांना त्यांचे पाठबळ आहे कायदा आणि सुवेवस्था हाताळण्यात यावल पोलीस स्टेशनचे काही अधिकारी हे नेहमी अपयशी ठरत असून त्यांच्यावर योग्य ती चौकशी करून कठोर कार्यवाही करावी अन्यथा उपोषणाला बसू असा गंभीर इशारा काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष तथा कोरपावली गावचे मा. सरपंच जलीलदादा पटेल यांनी केली आहे तसेच त्यांनी यावल पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी भाजी पाले विक्रते सह इतर व्यावसायिकांना त्रास देत असून अवैध धंदेवल्याना पाठीशी घालत असून भेदभाव करत आहे तरी त्याची ही दूटप्पी भूमिका मुखमंत्री गृहमंत्री तसेच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाजी पटोले यांना पत्राद्वारे कळवणार असल्याचे जलीलदादा पटेल यांनी दै. लोकशाही प्रतिनीधीशी
बोलतांना माहीती दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button