तरूणाईला आकार देण्यासाठी रा. से. यो. शिबीर महत्त्वाचे- डॉ. विजय मांटे
चोपडा येथील पंकज कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबीर आज दिनांक 4 जानेवारी 2020 रोजी सञासेन येथे संपन्न झाले. या समारोप कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष काकासाहेब भागवत भारंबे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. विजय मांटे रासेयो जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. किशोर पाठक चोपडा रासेयो विभागीय समन्वयक, ताईसाहेब सौ. भारंबेताई उपस्थित होते . कार्यक्रमाचे अहवाल वाचन प्रा. दिलीप गिऱ्हे यांनी केले. शिबीरा मागील सात दिवसातील केलेल्या श्रम संस्कार, योगाभ्यास, व्यायाम, परिसर स्वच्छतेच महत्त्व, बौद्धिक व्याख्याने, सञासेन गावात काढलेली फेरी, इ. विषयावर वरप्रकाश टाकला. प्रा. डॉ. विजय मांटे सर यांनी रा.से.यो. गीताचे महत्त्व पटवून देताना त्यामधील मतीत अर्थ समजून सांगीतला. स्वयंसेवकामध्ये रुजलेले श्रम संस्कार हे असेच समाजाची सेवा करण्यासाठी सज्ज असतील, तरूणांईला यामधून योग्य मार्गदर्शन लाभते त्यामुळे त्यांच्या जिवनाला आकार मिळतो. असे प्रतिपादन केले.
डॉ. किशोर पाठक यांनी रा.से.यो. शिबीरातून व्यक्तीमत्व विकास होतो. जिवनाला नविन कलाटणी मिळते असे सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात काकासाहेब भागवत भारंबे यांनी विद्यार्थी दशा समजावून सांगितली व भविष्याबद्दल आशावादी राहून स्वावलंबी जीवनाची यशस्विता स्पष्ट करून सांगितले.
कार्यक्रमाप्रसंगी रा.से.यो. स्वयंसेवकानी मनोगत व्यक्त केले. संघ नायकाचे सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलीप गिऱ्हे, सहाय्यक महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. नंदीनी वाघ व स्वयंसेवकानी परीश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार डॉ. नंदीनी वाघ यांनी मानले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व स्वयंसेवक उपस्थित होते.






