Amalner

?️अमळनेर कट्टा..तालुक्यात प्रस्थापितांना धक्का..तरुण पिढीची मुसंडी…शिवसेना गायब..राष्ट्रवादी आणि बीजेपीत लढत तर अपक्ष उमेदवारांनी अनेक ठिकाणी मारली बाजी…

?️अमळनेर कट्टा..तालुक्यात प्रस्थापितांना धक्का..तरुण पिढीची मुसंडी…शिवसेना गायब..राष्ट्रवादी आणि बीजेपीत लढत तर अपक्ष उमेदवारांनी अनेक ठिकाणी मारली बाजी…

अमळनेर :अमळनेर तालुक्यात 67 ग्राम पंचायतींची मत मोजणी पार पडली.यात अनेक धक्कादायक निकाल बाहेर आले आहेत. तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक ही नावालाच पक्षविरहीत झाली असे म्हणावे लागेल.कारण अनेक ठिकाणी प्रस्थापित पक्षांच्या मातब्बर नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.प्र डांगरी येथील प्रभाग 2 साठी ईश्वर चिठ्ठी चा उपयोग..प्र डांगरी येथील प्रभाग 2 साठी ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. पुरुष सर्व साधारण साठीच्या 2 उमेदवारांना 282 प्रत्येकी मतदान मिळाले त्यामुळे तहसीलदार व निवडणूक अधिकारी मिलिंदकुमार वाघ यांनी छोट्या मुलाच्या हातून दोन चिठ्ठ्या मधून एक चिठ्ठी काढून विजयी उमेदवार घोषित केला.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे यांच्या गडखांब येथे बापूराव खुशाल पाटील यांच्या पॅनलला 9 जागांवर विजय प्राप्त झाला आहे.
यात निंभोरा येथील किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पिरन पाटील यांचे पॅनल पराभूत झाले आहे. सानेगुरुजी स्मारक चे कार्यकर्ते प्रा सुनील पाटील व समाधान धनगर यांचे पॅनल विजयी झाले आहे. खवशीत प्रस्थापित काँग्रेस किसान सेल चे तालुकाध्यक्ष बी के सूर्यवंशी चे पॅनल पराभूत होऊन त्यांच्या विरोधातील श्यामकांत देशमुख यांचे पॅनल विजयी झाले. डांगरी येथील राष्ट्रवादीचे नेते तसेच माजी सरपंच अनिल शिसोदे यांना धक्का देत दिनेश शिसोदे यांचे पॅनल विजयी झाले आहे. शिरूड येथे राष्ट्रवादीच्या नेत्या जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील व शेतकी संघाचे माजी अध्यक्ष महेंद्र पाटील यांचे पॅनल पराभूत झाले आहे. आणि बीजेपी चे पस सभापती श्याम अहिरे यांना विजय प्राप्त झाला. सात्री येथे भाजप चे महेंद्र बोरसे यांचे पॅनल विजयी झाले आहे.तर झाडी येथे काँग्रेसचे धनगर दला पाटील यांना पराभव पत्करावा लागला आहे. भुपेंद्र पाटील विजयी झाले आहेत. लोण चारम येथे भाजप चे महेश पाटील यांच्या पॅनलला सर्व जागांवर पराभव पत्करावा लागला आहे.पाडळसरे येथे मात्र राष्ट्रवादीचे भागवत पाटीलचे पॅनल विजयी झाले आहे. अंचलवाडी येथे राष्ट्रवादीचे विकास पाटील यांच्या पॅनल ने पूर्ण 7 जागांवर विजय मिळवला आहे.तर मांडळ येथे संमिश्र निकाल लागला आहे. अनेक ग्राम पंचयतींमध्ये संमिश्र विजय प्राप्त झाले आहेत. तर अनेक ठिकाणी जुन्यांना बाजूला सारत नवीन पिढीने मुसंडी मारत विजय मिळवला आहे.अपक्ष उमेदवारांनी अनेक ठिकाणी विजय मिळवत आता हे देखील दाखवून दिले आहे की प्रस्थापित राजकीय पक्षांना धडक देण्याची क्षमता त्यांच्यात आहे. तसेच जनतेचा कौल देखील यातून दिसून आला आहे.आता सरपंच सोडतीची प्रतीक्षा असून त्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय आखाडा पेटणार आहे.विज्यीबअपक्ष उमेदवारांची भूमिका यात महत्वपूर्ण ठरणार आहे.

संपूर्ण निवडणुकीत निवडणूक अधिकारी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या संपूर्ण टीम सह उत्कृष्ट कार्य करत अत्यन्त शांततेच्या मार्गाने संपूर्ण प्रक्रिया पूर्णत्वास नेली.पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,गोपनीय अंमलदार डॉ शरद पाटील सर्व प्रशासकीय कर्मचारी यांच्या मेहनती मुळे तसेच उत्कृष्ट नियोजन यामुळे कोणत्याही प्रकारचा विलंब,गोंधळ न होता शिस्तीत सर्व प्रक्रिया पार पडली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button