विक्की खोकरे
चोपडा – तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने दिनांक ५ सप्टेंबर २०१९ पासून पुकारलेल्या संपात सहभागी होत असलेबाबत
चोपडा येथील तहसिलदार मा, अनिल गावीत यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी चोपडा येथील महसुल कर्मचारी संघटनेचे.श्री देवेंद्र नेतकर , श्री प्रविण बोरसे , श्री हरपे , श्री जामोदकर , श्री कांबळे , लियाकत तडवी ,श्री सुरेश पाटील ,श्री मगर सुलेमान तडवी आदी उपस्थित होते ..
यापूर्वी संघटनेच्या बैठकांमध्ये शासनाने संघटनेच्या मागण्या हया तत्वत: मान्य केलेल्या आहेत परंतू त्यावर शासन निर्णय काढून अंमलबजावणी केलेली नसल्याने महसूल कर्मचारी यांना नाईलाजास्तव बेमुदत संपावर जावे
लागत आहे. दिनांक ५ सप्टेंबर २०१९ रोजी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व १५ तालुक्यातील महसूल कर्मचारी संघटना जमा होणार असून आंदोलनाची सुरुवात करणार असल्याचे महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे..







