आखाडा विधानसभेचा…..
फैजपूर सलीम पिंजारी प्रतिनिधी
रावेर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढती चे चिन्ह असून अनेक जरी उमेदवार रावेर मतदारसंघात इच्छुक असले तरी या मतदारसंघात भाजपाचे इच्छुक नामदार हरिभाऊ जावळे काँग्रेसचे इच्छुक आमदार माजी आमदार शिरीष चौधरी भाजपा इच्छूक श्रीराम पाटील अपक्ष अनिल चौधरी भाजपाचे इच्छुक उमेदवार डॉक्टर कुंदन फेगडे असे आणखी काँग्रेसचे इच्छुक मसाका चे चेअरमन शरद महाजन यांच्यासह अनेक जण मतदारसंघात इच्छुक आहे. नामदार हरिभाऊ जावळे यांचा मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहे तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघातून एक वेळा तेच खासदार म्हणून त्यांनी (२००५) लोकसभा त्यांनी रवींद्र भैय्या पाटील यांच्या पराभव केला होता तीन वेळा आमदार म्हणून हरिभाऊ जावळे दोन वेळा माजी आमदार रमेश चौधरी यांचा तर गेल्या निवडणुकीत त्यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांचा अल्पशा मतांनी पराभव केला होता तेव्हापासून जावळे यांनी वेगवेगळ्या योजना मतदारांपर्यंत आणून त्यांचा लाभ मतदारांपर्यंत पोहोचविलेला आहे असे अनेक विकास कामे करून त्यांनी मतदार ठसा कायम ठेवला असून तरीसुद्धा अनेक इच्छुकांना वाटते की मोदी लाट आहे. म्हणून अनेक जण भाजपची उमेदवारी मागत आहे परंतु असे झाल्यास खरोखरच त्यांच्यावर अन्याय होणार नाही काय असा प्रश्न निकटवर्तीयांना पडला असून तसे झाल्यास हरी भाऊंचा गट नाराज होणार नाही का. असा प्रश्न सुद्धा उपस्थित होणार नाही का काँग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरी यांचा गेल्या वेळेस अल्पशा मतांनी पराभव झाला होता ते आजही काँग्रेसचे काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहे त्यांनी गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पराभव पत्करून सुद्धा आपली समाजसेवा सतत सुरू ठेवत त्यांनी गोरगरीब जनतेचे कडे जाऊन अनेक अडचणी जाणून घेत आपुलकीच्या भावनेतून सेवा सुरूच ठेवली कधीही मनात घेतले नाही की मी माजी आमदार आहे श्री चौधरी यांचा रावेर यावल तालुक्यात अनेक शिक्षण संस्था असून त्यांनी अनेक गरजू गरजूंना त्यामध्ये सामावून घेतल्यामुळे त्यांची पकड यावेळेस मतदारसंघावर घट्ट झालेली दिसत आहे तसेच भुसावळचे अनिल चौधरी व रावेरचे श्रीराम पाटील रावेर मतदार प्रथमच निवडणूक रिंगणात उतरणार असून अनिल चौधरी यांनी गेल्या दोन वर्षात रावेर मतदारसंघात संपर्क दौरा सुरू ठेवला आहे तसेच श्रीराम पाटील यांनी अचानक उमेदवारीचा घोषणांमुळे सर्वांना चक्रावून टाकले आहे. पाटील यांनी गेल्या सहा महिन्याच्या अल्पशा काळातच प्रकाश झोपात आल्याने त्यांनी हजारो कार्यकर्त्यांची फळी तयार करून घेत रावेर मतदारसंघात चौरंगी लडती चे चिन्ह निर्माण करून टाकले आहे. माजी आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी यांनी आपल्या वडिलांचा पाठबड म्हणून त्यांनी अल्पशा काळात शेकडो कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून रावेर यावल तालुक्यात जनसंपर्क दौरे करून सर्व उमेदवारांना मागे टाकून दिले आहे. विधानसभेची केवळ औपचारिकता बाकी असून वेळेवर ती काय घडामोडी होते याकडे रावेर यावल तालुक्याचे लक्ष लागले आहे.








Danish maniyar