पंढरपूर शहरामध्ये काँग्रेस कमिटी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण साजरा
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर शहर काँग्रेस कमिटी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं सदरचे ध्वजारोहन सोलापूर जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष दीपकराव भोसले यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षा कुमारी श्रीयाताई भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राज भादुले व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नागेश गंगेकर, राजू उराडे, ओबीसी सेलचे अध्यक्ष अशपाक भाई सय्यद, प्रताप राजपूत, अजय गंगेकर, मधुकर फलटणकर, ओबीसी शहराध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज जिल्हाध्यक्ष दीपक येळे, माजी नगरसेवक किरण घाडगे, विजय वाघ, विठ्ठल विषयी, दत्तात्रय बडवे, भाई भोसले दत्तात्रेय झरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा अनिता पवार, शहर सचिव विजयकुमार काळे, उपाध्यक्ष गिरिष चाकोते, सचिन कदम, विवेक पाटील, विजयकुमार पवार, समीर कोळी, मामा फलटणकर, बाळासाहेब आजबे, रामभाऊ परचंडे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी उपस्थितांचे आभार काँग्रेस कमिटी प्रसिद्धीप्रमुख पुरुषोत्तम देशमुख यांनी मानले. याप्रसंगी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करोना मध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय राजाबापू पाटील व त्यांचे बंधू महेश पाटील तसेच चुलते डॉ.अनंतराव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो अशी भावना शहराध्यक्ष ॲड. राज भादुले यांनी व्यक्त केली.






