Maharashtra

चांपा ग्रामपंचायतीत निधी अभावी स्वता सरपंचांनी श्रमदान करून गावकऱ्यांची समस्या सोडवली .!

चांपा ग्रामपंचायतीत निधी अभावी स्वता सरपंचांनी श्रमदान करून गावकऱ्यांची समस्या सोडवली .! 
चांपा येथील सरपंचाने दिला गावकऱ्यांना श्रमदान करण्याचा मूलमंत्र! 

चांपा ग्रामपंचायतीत निधी अभावी स्वता सरपंचांनी श्रमदान करून गावकऱ्यांची समस्या सोडवली .!

चांपा प्रतिनिधी अनिल पवार
चांपा येथे आज सायंकाळी अचानक मुसळधार पाऊस पडल्यामुळे गावात पूरस्थिती निर्माण झाली .व वार्ड क्रं दोन मध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांच्या घरात पाणी शिरलें यासंदर्भात सरपंच अतिश पवार यांना ग्रामस्थांनी माहिती दिली .सरपंच अतिश पवार यांना गावातील  वार्ड क्रं दोन मध्ये पूरस्थिती आल्याचे समजताच  तत्काळ सरपंच अतिश पवार यांनी वार्ड क्रं दोन गाठले .सर्व परिस्थितीचा आढावा घेतला ,  वार्ड क्रं दोन मध्ये रस्त्यावर पाणी भरल्यामुळे  गावकऱ्यांच्या घरात पाणी भरल्याने स्वता कुदळ पवाडे हातात घेऊन रस्त्यांवर अडलेलें पाणी सुरळीत करण्यास स्वता श्रमदान करायला सुरवात केली .सरपंच श्रमदान करीत असल्यामुळे  गावकऱ्यांनी सुध्दा जमेल तितके श्रमदान करून घरात घुसलेलें पाणी श्रमदानाने घरा बाहेर काढले . नागरिकांच्या घरातील अडलेल्या पाणी सुरळीत केले असून श्रमदानाने तत्काळ वार्ड क्रं दोनच्या पूरस्थिती वर मात करून नागरिकांना सोय करून दिली .व यावेळी गावातील नागरिकांना श्रमदानाचे महत्व पटवून दिले .व  वार्ड क्रं दोन येथील रस्ता व नाली  मंजूरीत असल्याचे गावकऱ्यांना सांगितले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button