Chopda

?जळगांव Live..संचार बंदी काळातही चोपड्यातील नागरिक रस्त्यावर, विनाकारण फिरणाऱ्यांची केली रॅपिड टेस्ट

?जळगांव Live..संचार बंदी काळातही चोपड्यातील नागरिक रस्त्यावर, विनाकारण फिरणाऱ्यांची केली रॅपिड टेस्ट

संचार बंदी काळातही चोपड्यातील नागरिक रस्त्यावर, विनाकारण फिरणाऱ्यांची केली रॅपिड टेस्ट

दिनांक 14 च्या रात्री आठ वाजेपासून लॉक डाऊन जाहीर झाले असून, संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. मात्र या संचार बंदी ला झुगारून चोपडा शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरताना दिसून आले. विनाकारण फिरणाऱ्यांना पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाने शिवाजी महाराज चौकात अडवून त्यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. जवळपास 75 नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यापैकी एकाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि त्याची रवानगी कोविड सेंटरमध्ये करण्यात आली. संचारबंदी च्या तुलनेत रस्ते गजबजलेले दिसले. रस्त्यांवर कुठेही शुकशुकाट दिसून आला नाही त्यामुळे ब्रेक दि चेन चोपड्यात शक्य होईल काय? असा प्रश्नही निर्माण झालेला आहे. विनाकारण फिरणाऱ्या मध्ये महिलांचा समावेश लक्षणीय दिसून आला. चोपडा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक अंबादास मोरे, नगरपालिका प्रशासनातील सहा. मुख्याधिकारी निलेश ठाकूर, पोलीस कुमक आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांचा ताफा रस्त्यावर येवून कारवाई करीत होते.तर आरोग्य विभागाच्या अधिपरीचारिका मार्फत रॅपिड टेस्ट करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button