Surgana

तालुक्यातील केशरी शिधापत्रिका धारकांचा समावेश प्राधान्य कुटूंबात करा सभापती मनिषा महाले

तालुक्यातील केशरी शिधापत्रिका धारकांचा समावेश प्राधान्य कुटूंबात करा. सभापती- मनिषा महाले.

विजय कानडे

तालुक्यातील केशरी शिधापत्रिका धारकांचा समावेश प्राधान्य कुटूंबामध्ये करावा अशी मागणी सभापती मनिषा भोये यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार विजय सुर्यवंशी यांच्या कडे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कडून दहा हजार व्यक्तिंचा समावेश अंत्योदय प्राधान्य कुटूंबामध्ये समावेश करुन धान्याचा लाभ देण्यात यावा.आदिवासी भागात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर हाताला काम नसल्याने जनतेची उपासमार होत आहे.त्यामुळे गरीबांना आधार देण्यासाठी शासनाने याची कार्यवाही तात्काळ करावी अशी मागणी केली आहे. यावेळी सरपंच मेनका पवार,भारती चौधरी

आदिवासी बचाव अभियानाचे केंद्रीय प्रतिनिधी रतन चौधरी, सामाजिक कार्यकर्ते योगेश जाधव,अशोक धुम,त्र्यंबक ठेपणे, देविदास हाडळ,राहुल गवळी,नितीन पवार,
पोलिस पाटील परशराम चौधरी आदि उपस्थित होते.

फोटो – सुरगाणा : तहसिलदार विजय सुर्यवंशी यांना प्राधान्य कुटुंबात समावेश करण्याची मागणीचे निवेदन सादर करतांना सभापती मनिषा भोये समवेत सामाजिक कार्यकर्ते.
प्रतिक्रया -” तालुक्यात सुमारे दहा हजार व्यक्तिंना अंत्योदय प्राधान्य कुटूंबा करीता धान्याचा इष्टांक प्राप्त झाला आहे. त्यामुळे केशरी शिधापत्रिका धारकांनी रेशन दुकानदारांशी अथवा तालुका पुरवठा अधिकारी यांचेशी संपर्क करुन धान्य रेशनकार्डावर प्राप्त करून घ्यावे ”
सभापती – मनिषा महाले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button